अर्धापूर कारवाई : ३१८ शिक्षक व ग्रामसेवकावर गुन्हे दाखल -NNL


अर्धापूर,निळकंठ मदने।
मुख्यालयीन राहता घरभाडे शासनाकडून घेणे तब्बल २९२ शिक्षक व २६ ग्रामसेवकांना भवले असून, यापुर्वीही हे प्रकरण गाजले होते. अखेर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश आल्यावर एवढी मोठी कारवाईची ही पहिलीच वेळ असल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषद येथे एकच खळबळ उडाली आहे.

अर्धापूर तालुक्यातील  २९२ शिक्षक व २६ ग्रामसेवकांनी मुख्यालयी न राहता घरभाडे उचलले ही बाब प्रारंभी माहिती अधिकार चे कार्यकर्ते सय्यद युनूस यांनी तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, त्यावेळी कारवाई ची मागणी केली,पण कारवाई झाली नाही, याप्रकरणी न्यायालयात ३० मार्च २०२२ ला हे प्रकरण  अड ए आर चाऊस मार्फत केल्याने दाखल केले.

याप्रकरणी दोन्ही गटातील वकीलांचा युक्तीवाद होऊन न्यायमुर्ती एम डी बिरहारी यांनी गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले, त्यामुळे राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची ही पहीलीच वेळ असल्याचे समजते.या घटनेमुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी