स्वर अंलकार प्रस्तुत अवघा रंग एक झाला या भक्ती गितास उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL


नविन नांदेड।
आषाढी एकादशीच्या निमित्ताने सिडको हडको येथे स्वर अंलकार प्रस्तुत अवघा रंग एक झाला सुरेल अभंग व भक्ती गितांचा कार्यक्रमाचे आयोजन राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते, यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा व्यापारी महासंघाचे दिलीप भाऊ कंदकुर्ते यांच्या हस्ते करण्यात आले.

खास आषाढी एकादशीच्या निमित्ताने स्वर अंलकार प्रस्तुत अवघा रंग एक झाला या भक्ती गिंताचा कार्यक्रमाचे आयोजन संयोजक अर्जुन गुंडाळे व प्रसिद्ध गायक महेश जैन व  गायक जसपाल सौनकांबळे, राघेश्री जोशी,अंकाक्षा मोतेवार यांनी अवघा रंग एक झाला,कायाही पंढरी,पाऊले चालती पंढरीची वाट,बोलवा विठ्ठल पहावा विठ्ठल ,सुंदर ते ध्यान, माऊली माऊली या गितासह अनेक भक्ती गित सादर केली.

यावेळी साथ संगत निवेदक मुरलीधर हंबर्डे,संजय देशपांडे,वाघवृंद प्रा.सुनिल बुचूडे, साहेबराव कांबळे,शेख जावेद, गजानन कुलकर्णी, वैभव येवले, संतोष देशमुख, यांनी तर विणा चंद्रशेखर कहाळेकर यांनी घेतला. या कार्यक्रमातील सहभागी कलाकारांना ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे सुधीर कदम,  सेवानिवृत्त तहसीलदार मंदाकिनी पाठक,शहाणे ज्वेलर्स नांदेड,मेरवान जाधव, शेख निजाम गंवडगावकर, विलास बिरादार ,अमोल पोकळे, बालाजी कामाजी, शिवकुमार शककरवार, आबासाहेब हंबर्डे, यांच्या  सन्मान व सत्कार करण्यात आला व मार्गदर्शक राजीव अंबेकर, चंद्रकांत नागठाणे यांच्ये लाभले. या कार्यक्रमास प्रा.अशोक कामठाणे, नरसिंग यलमलवाड, यांच्या सह महिला व भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी