झारखंडच्या दोघांना पूरातून बाहेर काढले,: जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी: जिकडे तिकडे पाणीच पाणी
अर्धापूर, निळकंठ मदने। तालुक्यात दोन दिवसांपासून व शुक्रवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे सर्व नद्या- नाल्यांना पूर आला,सर्वत्र हाहाकार झाला असून, शेलगाव,सांगवी,चिंचबन सह अनेक गावांचा शनीवारी संपर्क तुटला,तर पावसामुळे महामार्गाच्या अर्धवट कामामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतीत सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने पीकांचे नुकसान झाले, झारखंडच्या दोघांना पूरातून बाहेर काढण्यात आले, शनीवारी दिवसभर सुर्यदर्शन झाले नाही, सध्या पाऊस सुरुच आहे, यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.
अर्धापूर तालुक्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे, शुक्रवारी रात्रभर धो- धो पाऊस पडल्याने अचानक सर्व नद्यांना पूर आला, यामध्ये आसना नदी,शेलगाव,मेंढला,पार्डी, लोणी,सांगवी,चिंचबन नागझरी,यासह सर्व नदी - नाल्यांना पूर आला,अनेकजण कामगार शेतात होते,तर अनेकांचे जणावरे शेतात होते,पूरामुळे गैरसोय झाली,के टी कंन्ट्रक्शन च्या गलथान नियोजनामुळे महामार्गालगत चोरंबा,पार्डी,शेनी, अर्धापूर,दाभड, पिंपळगाव येथील शेताचे पुर्वीचे पाणी जाण्यासाठीच्या नाल्या बंद पडल्याने शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून पीकासह जमीन खरडली आहे, तालुक्यात अनेक ठिकाणी जमीन खरडली आहे,आसना पुलाच्या केवळ एक फुट पाणी खालून जात होते, केव्हाही नांदेड शहराचा संपर्क तुटू शकतो, मालेगाव परीरात पीकांचे नुकसान झाले आहे,शेलगाव येथे नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे,सांगवी येथे ही असाच प्रकार आहे,
बामणी येथील नवीन पुलाचे काम करण्यासाठी थांबलेल्या मजुरांना सकाळी पूर दिसला, पुरात अडकलेल्या झारखंडच्या दोन मजूरांना एस डी आर एफ च्या पथकासह गावकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले, सर्वत्र पुरदृश्य परीस्थिती होती, पावसामुळे पीकासह जमीन खरडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, यावेळी शनीवारी जिल्ह्याधीकारी डॉ विपीन ईटनकर यांनी शेलगाव, बामणी परीसरात पाहणी केली,नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सुरक्षीत ठिकाणी मुक्काम करावा व प्रत्येक गावातील तलाठी व ग्रामसेवकांनी या संकटकाळात आपापल्या नौकरीच्या गावातच मुक्काम करुन प्रशाशनाला वेळेत माहिती द्यावी,अफवावर विश्र्वास ठेवू नये अशी प्रतिक्रिया दै.पुण्यनगरीशी बोलतांना दिली, यावेळी तहसीलदार उज्वला पांगरकर,नायब मारोतराव जगताप, गटविकास अधिकारी मिना रावताळे,पोलिस निरीक्षक अशोक जाधव, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे,तलाठी, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती .