नविन नांदेड। सिडको हडको परिसरासह कौठा भागात मुख्य रोडवर दुतर्फा मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळित झाली होती अखेर सिडको क्षेत्रीय कार्यालय चा स्वच्छता पथकाने पाण्याचा निपटारा केल्या नंतर वाहतूक सुरळीत झाली तर अनेक सखल भागात संततधार पावसामुळे पाणी साचले होते.
सिडको हडको परिसरातील अनेक भागात दि.८ जुलै रोजी सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस होत गेल्याने सखल भागात पाणीच पाणी झाले, रात्री मोठ्या प्रमाणात व सकाळीही पाऊस झाल्याने सिडको मोढा प्रकल्प अंतर्गत असलेल्या नालयातुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते, सकाळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुतर्फा रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने दुचाकी , तिनं चाकी वाहने जात नसल्याने वाहतूक विस्कळित झाली होती तर मोठी वाहने जात होती, सिडको मोढा प्रकल्प अंतर्गत असलेल्या अनेक वसाहती मध्ये व परिसरात पाणी च पाणी झाले, तर कौठा भागातील विकासनगर, वृंदावन कालनी भागातील रोडवर व सखल भागातील अनेक वसाहती मध्ये पाणीच पाणी झाले.
अखेर सिडको क्षेत्रीय कार्यालय चे सहाय्यक आयुक्त डॉ.र ईसौधदीन यांनी स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,अरजृन बागडी व स्वच्छता कर्मचारी यांच्या सहकार्याने लातुर फाटा भागातील पाण्याचा निपटारा करून रोडवरील वाहनारे पाणी बंद करून नाल्या व्दारे व कौठा येथील रोडवरील तुंबलेल्या पाण्याचा निपटारा केला आहे. रस्त्याच्या कामामुळे व संततधार पावसामुळे मात्र नागरीक, वाहनधारक यांना नाहक त्रास सोसावा लागला आहे.