नविन नांदेड। मराठवाड्याचे भाग्यविधाते ,जलप्रनेते तथा माजी केंद्रीय मंत्री कै .शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्य वाजेगाव जवळील वडगाव ता.जि.नांदेड येथील समाधी स्थळी चव्हाण कुटुंबीय कढून विधीवत पूजन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री मंत्री अशोकराव चव्हाण , माजी आमदार सौ.अमिता भाभी चव्हाण, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
दि .१४ जुलै रोजी वडगाव येथील समाधी स्थळी सकाळी कुटुंबातील सदस्यांनी पूजन करून अभिवादन केले यावेळी माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमिता भाभी चव्हाण,सुजया चव्हाण,जया चव्हाण, नरेंद्र चव्हाण,माजी राज्यमंत्री शिर्डी संस्थान विश्वस्त डी .पी .सावंत, आ.अमर राजुरकर, आ.मोहनराव हंबर्डे, आ. माधवराव पाटील जळगावकर, आ. जितेश अंतापुरकर,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, महापौर जयश्री ताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर,
जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर,जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसीलदार किरण अंबेकर,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे,बी.आर. कदम ,गणपतराव तिडके, जिल्हा परिषद सदस्य डॉ.मिनलताई खतगावकर, मनोहर पाटील शिंदे,पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी फ्युम भाई,धनेगावचे सरपंच पिंटू पाटील शिंदे ,नगरसेवक बालाजी जाधव, विरेंद्र सिंग गाडीवाले,उमेश पवळे,माजी उपमहापौर आनंद चव्हाण, माजी सभापती बालाजीराव पांडागळे, डॉ .नरेश रायेवार,सिडको ब्लॉक अध्यक्ष विनोद कांचंनगिरे ,
दक्षिण विधानसभा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ,प्रा.सौ.ललिता शिंदे ,राजु लांडगे,शेख अस्लम,प्रा.डॉ.रमेश नांदेडकर ,आहातखान पठाण ,दत्तू कुलकर्णी ,दलित मित्र माधव अंबटवार, नारायण कोंलबीकर,माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे, शंकरराव धिरडीकर, संजय कदम, एस.पी.कदम, भि.ना.गायकवाड ,आंनदराव गायकवाड, प्रा, मुकुंद बोकारे, बाबुराव अवनुरे, बालासाहेब मोरे,यांच्या सह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, संरपच , ग्रामपंचायत सदस्य, महिला , जेष्ठ ,यूवक ,पदाधिकारी कार्यकर्ते ,आदींनी समाधीस्थळी अभिवादन केले. ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली समाधीस्थळ परिसर असलेल्या वडगाव या ठिकाणी व परिसरातील अनेक भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.