हदगाव। हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये तातडीने मदत देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
हदगाव तालुक्यातील गेल्या दहा ते बारा दिवसापासून सातत्याने पडलेल्या पावसामुळे शेतातील पीक ज्यात सोयाबीन ,कापूस ,तूर, ज्वारी ,उडीद ,मूग ,हळद, ऊस ,फळबाग इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . तेवढेच नाही तर शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट हि आले आहे.
त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष हादगावच्या वतीने आज दिनांक 14 7 2022 रोजी लेखी निवेदन उपयोगी अधिकारी हदगाव व तहसीलदार यांना देऊन शेतकऱ्यांना प्रत्येकी हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे .यावेळी उपस्थित हादगाव तालुकाप्रमुख अनिल पाटील कदम, हदगाव तालुका सचिव संदीप वानखेडे ,शहर प्रमुख संतोष वाघमारे, पप्पू कदम वाळकीकर ,गजानन जिदेवार, दीपक सूर्यवंशी, भानुदास शिंदे ,गोदावरीबाई गायकवाड इत्यादी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.