नांदेड। महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील उमरीचे माजि नगराध्यक्ष आर्यवैश्य समाजसेवक विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार ह्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मुर्तीला दोन सुवर्ण मुकुट अर्पण करण्याचा संकलप्प केला होता. त्या अनुषंगाने आषाढी एकादशीला तो पूर्णत्वास जाणार आहे.
एकूण १९६८ ग्राम शुद्ध सोन्या पासून निर्मित असून, त्याची किंमत रू.१ कोटी ३ लाख आहे. मे.विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार सराफ ह्यांच्या कडून हे मुकुट अर्पण करण्यात श्री विजयकुमार व सौ जयश्री उत्तरवार समवेत त्यांचे सुपुत्र ओमकार,अरविंद,अजय, अच्य्युत,व डॉ.अनंत उत्तरवार सहभागी होणार असल्याची माहिती विजयकुमार उत्तरवार ह्यांनी हिंगोली येथे पत्रकार डॉ. विजय नीलावार ह्यांच्या निवासस्थानी दिली.
कोरोनाच्या सुरुवातीला विजयकुमार उत्तरवार ह्यांनी उमरी न.प.,सरकारी दवाखाना,व पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांच्या कार्यागौरवार्थ लाखो रू देणगी दिली होती.त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल त्यांचा व कुटुंबीयांचा सत्कार त्यांचे भाचे डॉ.विजय नीलावार ह्यांनी केला.ह्या कार्याच वारकरी संप्रदाय कडून कोतुक होत आहे.