शहरातील नागरिकांना लघुशंकेसाठी ठिक - ठिकाणी मुतारीची व्यवस्था करा - वंचित बहुजन आघाडी -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर।
मुखेड शहरातील मुख्य रस्त्यावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर तसेच तहसील कार्यालय आणि पंचायत समिती या परिसरात ग्रामीण भागातून जनता आपल्या शासकीय कामासाठी येत असते. त्यांना या परिसरात लघुशंकेची सार्वजनिक सोय नुसल्याकरणे त्यांना पंचायत समिती व शासकीय गोडाऊन च्या परिसरात जावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी दुर्गंध निर्माण होत असून त्याच्या आजूबाजूला या परिसरातील लोकांना त्रास होत आहे.

ही बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर सार्वजनिक लघुशंकेची सोय करावी करण्यात यावे या साठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शंकर पाटील आखर्गेकर तसेच उपाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला, अँड संजय भारदे, पवन कांबळे, शहराध्यक्ष डाॅ.राजकुमार जोंधळे, सोशल मीडियाचे गजानन येलमे सह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी