नांदेड| कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अशोकराव चव्हाण साहेबांचे खंदे समर्थक तथा साहेबांना आपले कुलदैवत मानणारे सुभाषराव देशमुख चिकाळेकर व शिवाजी पवार लहानकर यांच्यावतीने कौठा परिसरातील श्री साई मंदिर येथील गो-शाळेत फळे वाटप करण्यात आली.
देशाचे माजी गृहमंत्री, पाणीदार नेतृत्व, मराठवाड्याचे भगीरथ कै.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम व सामाजीक उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण करतात. शारदा भवन शिक्षण संस्थेच्या अंतर्गत यशवंत महाविद्यालय, आयटीएम कॉलेज, अर्धापूर कॉलेज परिसर निसर्गरम्न करण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला.
अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या मृतांच्या कुटूुंबियांना आर्थिक मदत करणे, कोरोना काळात भोकर मतदार संघात उद्योग माहिती पुस्तीका, मास्क व सॅनिटायझर वाटप, अशोकराव चव्हाण यांना कोरोनामुक्त करण्यासाठी कुबेरनाथ येथे महामृत्यूंजय महाअभिषेक तसेच अंबाळी देवस्थान ता.उमरखेड जि.यवतमाळ येथे चक्रधर प्रभूच्या देवस्थानी दुसर्यांना कोरोनामुक्त होण्यासाठी ओठी, विडाअवसर, दुपारची आरती, साधूसंतांना पंगत भोजन करण्यात आले. अशा सलग सातव्या वर्षी देखील अनोखा उपक्रम राबवून साईमंदिर कौठा गो-शाळेत गोमातांना फळे वाटप करून कै.शंकररावजी चव्हाण साहेब यांची जयंती सुभाषराव देशमुख चिकाळेकर यांच्यावतीने साजरी करण्यात आली.
सुरूवातीस श्री साईबाबांचे दर्शन घेवून गो शाळेतील गोमातांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी अशोकरावांचे खंदे समर्थक सुभाषराव देशमुख चिकाळेकर, शिवाजी पवार लहानकर, साईबाबा ट्रस्ट देवस्थानचे अध्यक्ष जगन्नाथ चक्रावार, चक्रधर खानसोळे पाटील, मंदिराचे पुजारी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.