नांदेड| शिपला कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणीकडून ८२ हजार १९० रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना दि.२८ जून रोजी घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, विष्णुपुरी येथील रहिवासी असलेल्या मुक्ताबाई भैरवनाथ जाधव वय २५ वर्ष यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, दि.२८ जून रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुलांचे वसतिगृह येथे यातील अज्ञात आरोपीने मुक्ताबाई जाधव यांना शाइन डॉट कॉमवरून कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.
विविध टप्प्यात एकूण ८२ हजार १९० रुपये फोन पेद्वारे भरण्यास भाग पाडून मुक्ताबाई यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुक्ताबाई भैरवनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हे करत आहेत.