हिमायतनगर| तालुक्यातील मौजे वाशी येथील कलाल समाजील केशव परमेश्वर रायपलवार यांच्या किराणा दुकानात धुमाकूळ घालून अज्ञात चोरटयांनी घरात दरोडा टाकून दि. ५ जुलै रोजी रात्री १२.३० ते १ वाजताच्या दरम्यान मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेची तातडीने चौकशी करून आरोपींचा मुसक्या आवळून फिर्यादीला न्याय मिळवुण द्यावा अशी मागणी केली जात आहे.
या दरोडेखोरांनी दरोडा टाकून केशव रायपलवार यांच्या किराणा दुकानातील २ व ५ रुपयाच्या बंदयाची चिल्लर ३ हजार नगदी व केशव यांच्या पत्नीच्या गळ्यातील ५ ग्राम मनी मंगळसुत्र, कपाटातील रोख १० हजार रुपये असे सर्व मिळून जवळपास ४० हजार रुपयाचा ऐवज चोरून नेला आहे. हिमायतनगर तालुक्यातील मागल्या काही दिवसापासून चोरी, लूटमार, दरोडे, यासह अनेक घटना घडत आहेत. या घटनांकडे पोलिसांनी गंगाभीर्याने लक्ष दिले असून, नुकतेच डोळ्यात चटणी पूड टाकून लुटणाऱ्या चोरट्यान पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात असून, आत्तापर्यंत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. असे असताना पुन्हा एक घटना तालुक्यातील वाशी येथे घडल्याने नागरिकात पुन्हा चोरट्यांनी दहशत निर्माण झाली आहे.
अत्यंत गरिब आणि होतकरू तरुण केशव परमेश्वर रायपलवार यांनी मेहनत करून पायीपायी जमविली होती. मात्र अचानक घरात अज्ञात चोरट्यानी दरोडा टाकणाला आणि होत्याचे नवहते झाले. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या चोरीच्या प्रकारांची चौकशी करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी सुनिल प्रभाकर अनंतवार प्रदेशध्यक्ष कलाल, गोड समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांनी दि.०६ रोजी हिमायतनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी साहेबांना देण्यात आले. निवेदन देताना बालाजी रायपलवार, केशव रायपलवार, शंकर रायपलवार, संतोष चामनर आदींची उपस्थिती होती.