मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रयत क्रांतीचे पांडुरंग शिंदे यांची मागणी
नायगाव/मुंबई। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी घेऊन नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची कैफियत मांडून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली.
पांडुरंग शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील ५ लाख ३३ हजार ३८४ शेतकऱ्यांचे २ लाख ९७ हजार ४३२ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.यात १ हजार ४२९ हेक्टर क्षेत्राखालील जमीन खरडून गेली आहे .हा प्राथमिक अंदाज आहे, ह्यापेक्षा अधिक नुकसान जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे.
खालील मागण्या मान्य करून शेतकऱ्याला न्याय द्यावा.१) जिरायत बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत घ्यावी. २)बागायती बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत घ्यावी. ३) जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत घ्यावी. ४) घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना प्रती कुटुंब १ लाख रुपये मदत द्यावी. यावेळी हिंद युवा परिषदेचे रणजित देशमुख उपस्थित होते.