हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव ते वारंगा हे राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने होत आहे. त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहे. आता जिल्हाधिका-यानी याकामाकडे लक्ष घालवे व होणारे आपघात टाळावे. अशी मागणी एका निवेदन द्वरे बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली आहे.
त्यांनी जिल्हाधिकारी दि ७ जुलैला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हदगाव ते वारंगा हा राष्ट्रीय महामार्ग मागील तीन वर्षापासून काम सुरु आहे. हा राष्ट्रीय महामार्गाचे काम सदभावना कन्ट्र्कश्न कंपनी करीत असुन, या कंपनीचे काम संथगतीने होत असल्याने व अर्धवट कामामुळे या महामार्गावरील अनेक पुलाचे व रोड काम रखडले असल्याने अनेक अपघात झालेले आहे.
परिणाम स्वरुप अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या तीन वर्षापासुन या भागातील नागरिकांना वाहनधारकांना हे राष्ट्रीय महामार्ग अपघाताचे आमञण ठरत आहे. असही दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे. सदरील कामा बाबतीत स्वतः जिल्हाधिकारी नादेड याँनी या बाबतीत लक्ष देवून संबंधित कञाट घेणा-या कंपनीस सदर काम तातडीने पुर्ण करण्याचे आदेश दयावे व होणारे अपघात टाळावे अशी मागणी बाबुराव कदम यांनी निवेदनात केली आहे.