नदीच्या पुरात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना बैलांनी दिले जीवदान तर पुरामुळे, काही गावांचा संपर्क तुटला,
भोकर/गंगाधर पडवळे। तालुक्यात शुक्रवारच्या रात्री पासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील नदी,नाले दुथडी भरून वाहत आसल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे याच दरम्यान दि.९जुलै रोजी सकाळी ११ च्या दरम्यान तालुक्यातील मौ. भुरभुशी येथे वीज पडून एका मुलीच्या दुर्दैवी मृत्यू झाला तर पुरात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना बैलांमुळे जीवदान मिळाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून आज पहाटे पर्यंत ७८.३० मी.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून भोसी-खराबी येथील सीता नदी,बोरगाव,दिवशी येथील सुधा नदी,पिंपळढव,मातुळ, दिवशी,डौर येथील वाघू नदी इत्यादीं नद्यांना पूर आल्याने गावातील या नद्यां दुथडी वाहत असून नदी परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे सदरील नद्यांच्या लागत असलेल्या गावात पुराचे पाणी शिरल्याने आणि काही पुलांवरून पाणी वाहत आसल्याने त्या गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशी माहिती तहसील कार्यालया कडून प्राप्त झाली आहे.
यादरम्यान दि.९जुलै २०२२ सकाळी ११ च्या सुमारास मौ.भुरभुशी येथील शेतकरी कुटुंबातील चंद्राबाई नारायण गमेवाड व तिची मुलगी आडेला नारायण गमेवाड त्यांच्या गुरांना शेताकडे नेत असतांना गावाशेजारील तलावाजवळ अचानक वीज पडली यात कु.आडेला नारायण गमेवाड (वय १४ वर्ष) हीच दुर्दैवी मृत्यू झाला तर गुरे आणि तिची आई सुदैवाने बचावली परंतु यात ती आई जखमी झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र किनी येथे पुढील उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. तर घटनास्थळी तहसीलदार राजेश लांडगे,नायबतहसीलदार रेखा चामनर,मंडळ अधिकारी शेख मुसा सरवर,तलाठी सुभाष जगताप व तलाठी पंजाब मोरे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
मौजे लगळुद येथील शेतकरी माधव लक्ष्मण पंडीलवाड,शंकर लक्ष्मण पंडिलवाड हे त्यांच्या सुधा नदीकाठी रावणगाव शिवारातील त्यांच्या शेतातील आखाड्यावर थांबले असता नदीच्या पुराणे त्यांना वेढले यावेळी नदी पुरातून बाहेर निघण्यासाठी त्यांना मानवी मदत मिळाली नाही परंतु त्याच्याकडे असलेल्या दोन बैलांनी नदीच्या पुरातून पोहत या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली सदरील बैलांचे शेपूट धरून हे शेतकरी पुराच्या पाण्यातून रावनगावकडे आले आहेत.सदरील बैलामुळे या शेतकऱ्यांना जीवनदान मिळाल्याने बैलांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्र तेंलगाना या दोन राज्यांना जोडणारा राष्ट्रीयमहामार्ग 61 वरील मौ.मातुळ तालुका भोकर येथील नव्यानेच बांधण्यात आलेल्या वाघू नदीवरील पुला लगत असलेला मुरूम भरना हा खचला असल्याने पुला जवळील रस्त्याला तडे गेली आहेत तर रस्त्याचा काही भाग खाली दबला आहे. वाहतुकीस धोका निर्माण झाल्याने रस्त्यावरील रहदारी त काही काळ ठप्प झाली होती. तर सदरीकल पूल ठिकाणी तहसीलदार राजेश लांडगे नायबतहसीदार रेखा चामनार यांनी भेट दिली असून तहसीलदार यांनी पुलाचे बांधकाम करणाऱ्या पुणे येथिल प्रसिध्द टी अँड टी कंपनीला तात्काळ दुरुस्तीच्या सूचना दिल्या असून वाहन धारकांनि काळजी घ्यावी असे आव्हाहन केले आहे.तर सुचने नंतर बांधकाम कंपनीच्या कामगारांनी रस्त्या दबल्या ठिकाणी येऊन सिमेंट काँक्रेट करून तात्पुरती स्वरूपात डागडुजी केली आहे. सदरील बांधकाम कंपनीचे निकृष्ट दर्जाचे काम पहिल्याच पावसाने निदर्शनास आल्याने सदरील बांधकाम करणाऱ्या कंपनीवर महामार्ग बांधकाम विभाग कसली कारवाई करेल याकडे प्रवाशी व परिसरातील नागरिक मोठ्या आशेने पाहत आहेत.
मातुळ येथील वाघू नदीचे पाणी गावात तसेच नदी शेजारील सतीश रामराव कदम यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरून पूर्ण पीक पाण्याखाली आले असून शेती उपयोगी अवजारे,टिन शेड वाहून गेले आहेत यासह सुधा नदीचे शेजारील बोरगाव, नांदा खुर्द, दिवशी या गावात पाणी शिरल्याने पुलावरील पाणी वाहल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून लागळुद, रावणगाव यादोन गावात पाणी शिरल्याने दहा कुटूंबियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील भुयारी मार्गात तलावाचे स्वरूप आले तर शहरातील काही प्रतिष्ठने दिवसभर बंद होती.