नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या नावघाट पुलावरून पाणी वाहत असल्याने दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाहतूक बंद करण्यात आली या वेळी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड व सिडको क्षेत्रीय कार्यालय चे सहाय्यक आयुक्त डॉ.र ईसौधदीन , कर्मचारी ऊपसिथीत होते.
गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसामुळे व गोदावरी नदीच्या पात्रात विष्णुपुरी येथील प्रकल्पातुन पाण्याचा प्रवाह वाढल्याने नावघाट पुलावरून पाणी वाहत असल्याने दुपारी चार वाजता वाहतूक बंद करण्यात आली,या पुरामुळे नदीकाठी असलेली स्मशानभूमी पाण्याखाली गेली असुन नदीकाठच्या मुझामपेठ येथील नागरिकांना निवासस्थाने खाली करण्याचा सुचना दिल्या आहेत,
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्ये आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सुंकेवार, सहाय्यक आयुक्त अजित पाल संधु , डॉ.र ईसोधदीन यांनी सकाळी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या नाव घाट पुल, वसरणी नाला, साईबाबा मंदिर कमान,लातुर फाटा परिसर व सखल भागाची पाहणी केली होती,व स्वच्छता निरीक्षक यांना सुचना दिल्या होत्या, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाण्याचा प्रवाह वाढल्याने नावघाट पुलावरून जाणारी येणारी वाहतूक ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड सिडको क्षेत्रीय कार्यालय चे सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन यांच्या ऊपसिथीत तर ईतवारा हद्दीतील येणारी वाहतूक क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे व ईतवारा पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी यांनी बंद केली. नदीकाठच्या दोन्ही बाजुने पुर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक महिला युवक यांनी गर्दी केली होती.