दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीत हदगांव प्रथम क्रमांकावर आणणार - ब्रिजेश पाटील -NNL


नांदेड।
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हदगांव येथे उप जिल्हा रुग्णालयात दिव्यांगासाठी प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषद नांदेड येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके व तहसिलदार जिवराज डापकर आणि गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड व दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल, वैद्यकीय अधिक्षक डॉ.व्हि.जी. ढगे, डॉ.प्रदीप स्वामी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कदम यांच्या उपस्थित या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व वितरण शिबिराचे आयोजन उप जिल्हा रुग्णालयात हदगांव येथे या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिराचे सुरुवात करण्यात आली आहे.


दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व वितरण शिबिरामध्ये हादगाव तालुका हा नांदेड जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी आपल्या भाषणातून म्हटले आहेत. व तसेच तालुक्यातील कोणताही दिव्यांग व्यक्ती त्यांच्या हक्कांपासून व दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहणार नाही यांची तालुका प्रशासन व आरोग्य प्रशासनाने दक्षता घ्यावी. या शिबिरात जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्र संचालन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रदीप सोनटक्के यांनी केले. 

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके व तहसिलदार जिवराज डापकर, गट विकास अधिकारी मयूर आंदेलवाड, दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्हि.जी ढगे, डॉ. प्रदीप स्वामी, डॉ. स्मिता टेंगसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कदम, सुनिल तोगरे, दिव्यांग साहय्यता कक्ष प्रमुख माधव आवळे, तलाठी जनार्दन मुंगल, पोलीस पाटील बालाजी कल्याणकर, दिव्यांग शाळेचे विशेष शिक्षक गजानन मोरे, सुदेश आगरकर, रवी आचार्य, संजय बोधने, बालाजी वाघमारे, शिवकुमार काष्टे, राम वट्टमवार, धारेश्वर डाके, सचिन माने, प्रभाकर मुधोळ, आदीसह शेकडो दिव्यांग या शिबिरास उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी