नांदेड| भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदी श्रीमती द्रोपती मुर्मू ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या निमित्त व महाराष्ट्रामध्ये राजकीय ओबीसी आरक्षण मिळवून दिल्याबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन करत हनुमान पेठ येथे भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष महानगर प्रवीण साले, ओबीसी जिल्हा अध्यक्ष महानगर व्यंकटेश जिंदम, प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप कंदकृती कंदकुर्ते, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड, अरविंद भारतीया, विजय गंभीरे, अशोक पाटील धनेगावकर, वेंकट मोकले, शितल खांडील, प्रभू कपाटे, आशिष नेरलकर, दिलीपसिंग सोडी, शंकर मनाळकर, मनोज जाधव, मारुती वाघ, सुनील भालेराव, रुपेश व्यास, राज यादव, यादव सोनू कल्याणकर, हरभजनसिंग पुजारी, बंटी ओबेरॉय भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.