किनवट, माधव सूर्यवंशी| राज्यातील ओबीसी घटकांना सर्वच क्षेत्रात आरक्षण संदर्भात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने इम्पेरिकल डाटासह आवश्यक त्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून बांठीयासमितीचा अहवाल न्यायालयाने स्वीकारून ओबीसी घटकांना 27 टक्के आरक्षण जाहीर केल्याने किनवट काँग्रेस कमिटी यांनी आज दिनांक 22 .7 . 2022 रोजी शहराच्या मध्यवर्ती चौकातील छत्रपती शिवाजी राजे यांच्या पुतळ्याजवळ , आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्याजवळ फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला.
याप्रसंगी किनवट शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, तथा माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानेवार, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष नवीन भाऊ राठोड, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार ,माजी नगराध्यक्ष के मूर्ती, प्रकाश गेडाम, गिरीश नेमानी वार, दिलीप पाटील, स्वामी नूतने पिल्लेवार, बाभुळकर, नवीन जाधव, परविन बेगम, खेडकर माधव, चव्हाण फारुख, के स्वामी, जवाब आलम,अन्वर भाई, शादुल्ला आहेमद, किशोर पवार, कदम ताई, बापूसाहेब पाटील, सत्तार खिच्ची,संतोष अडकिने पाटील,फारुख बाबा,भगत, आधी पदाधिकाऱ्यासह इतरही कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.