गोगलगायींनी सोयाबीनची पिके कुरतडायला सुरूवाट केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| जिल्ह्यातील ग्रामीण आणि सीमावर्ती भागातील अनेक ठिकाणी सोयाबीन पिकावर वानू (पैसा) गोगलगाईने आक्रमण केले असून, त्या कोवळ्या पिकाला अत्यंत हानिकारक ठरत आहेत. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कोवळ्या पिकाची पाने कुरतडून गोगलगाय पिकाचे नुकसान करत आहेत. यासंदर्भात कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. त्यानंतर पावसाची उघडझाप झाल्याने शेतीत गोगलगायींची सांख्य वादहली आहे. नगदी पीक म्हणून सोयाबीन कडेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा ओढा आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे पिक चांगल्या बहरात येत असतानाच अनेक ठिकाणी वानू (पैसा) गोगलगायचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, काही शेतकरी तर चक्क पिकावर नांगर फिरवून दुसऱ्यांदा पेरणी करण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होत नसल्याने शेतकऱ्यावर हे संकट कोसळले आहे. खरे पाहता कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीसह पिकांची कशी काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन व माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र हिमायतनगर येथील कृषी विभाग कुंभकर्णी झोपेचे सोंग घेते आहे का..? असा सवाल नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यातून व्यक्त केला जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यासह अनेक तालुक्यात गोगलगायीच्या प्रभावाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ज्या ठिकाणी वानू (पैसा) गोगलगायचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे, त्या ठिकाणी गोगलगाईच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना माहिती मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत. सिरपल्ली, डोल्हारी भागासह तालुक्यातील इतर गावच्या शेतकऱ्यांना यावर उपाय म्हणून कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र कृषी खात्याकडून अधिकृतरित्या यासंदर्भात अद्याप तरी कोणत्याही सूचना आल्या नसल्याची माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना दिली आहे.
शेतात सोयाबीनवर वानू (पैसा) झाडावर जाऊन शेंडे कट करीत आहे. यामुळे कोवळ्या वयात सोयाबीनचे खूप नुसकान होते. असे प्रकार कोणत्या शेतकऱ्याच्या शेतात दिसत असतील तर यावर नियंत्रण आणण्यासाठी लवकरात लवकर नियंत्रण करून घेणे गरजेचे आहे. खरे पाहता गोगलगाय हि शेतात सर्वत्र दिसते मात्र आत्ताच सोयाबीनचे शेंडे का कुर्रतडत आहे. कारण आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा कमी होत आहे. त्यामुळे गोगलगायींना हि कर्बयूक्त माती खाण्यास मिळत नसल्याने सोयाबीनची कोवळी पिके कुरतडत आहे. या गोगलगायीच्या क्रमांकावर नियंत्रण मिळविण्यासाठी ३ किलो पोहा, मुरमुरे, तुरीचा कळना किंवा हरबराचे कुटार पण चालत. यामध्ये जे. यू कंपनीचे fs मंत्रा २५० मिली व कोलरो ३०० मिली हे मिश्रण करून पूर्ण रानाने खत शिंपडल्या सारखे शिंपडून घ्यावे असे आवाहन क्रॉप डेव्हलोपमेंट ऑफिसर दत्ता ढवळे, सिरपल्लीकर यांनी केले आहे.