नांदेड। नांदेड जिल्हयात पाच दिवसा पासुन संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदि नाले ओसंडुन वाहत आहेत, परीणामी अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलेला असतांना वाहतुकही बंद आहे, अशातच हदगाव तालुक्यातील करोडी येथिल वराचे नियोजीत लग्न उद्या दि. १५ शुक्रवारी उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथे आहे. तत्पुर्वी आजच्या टिळा, हळदिच्या कार्यक्रमासाठी नवरदेव थर्माकॉलच्या हुडी वरून सासुरवाडीत पोहचला असुन लग्नासाठी उताविळ नाही तर नियोजीत विवाह कार्यक्रमात बिभत्स नृत्य करून उशीर करणाऱ्या वर मुलांना सामान्य कुटूंबातील वराची हि चपराक आहे.
करोडी ता. हदगाव येथिल शहाजी माधव राकडे आठवी शिकलेला तरूण आहे, परीवारात आई वडील, भाऊ, दोन बहिणी असा परीवार आहे, बहिणींची लग्न झालीत घरी शेती वगैरे काही नाही, मोल मजुरी करून कुटूंबाचा चरीतार्थ चालतो, त्याचा विवाह नात्यातीलच संगम चिंचोली ता. उमरखेड येथिल वधु गायत्री बालाजी गोंडाडे या मुलीशी एक महिण्या पुर्वी जुळुन आला होता.
ठरल्या प्रमाणे दि. १४ गुरूवारी सकाळी वधुकडे टिळा कुंकु पानवाट्याचा रात्री हळदीचा कार्यक्रम होता, सततच्या पावसामुळे सर्वत्र पुर परस्थिती असतांना संगमचिंचोली हे पैनगंगानदी व कयाधु नदिच संगम स्थान आहे त्यामुळे येथिल पुर परस्थिती विचारा पलीकडची असते, असे असतांना ठरल्या प्रमाणे नियोजीत वेळी टिळा, कुंकु पानवाट्याच्या कार्यक्रमात पोहचायच कस असा प्रश्न असतांना वरा कडील मंडळी वर शहाजी राकडे सह नातेवाईक थर्माकॉलच्या हुड्या वरून नदि मार्गे ७ कि.मी. अंतर कापत सासरवाडी संगम चिंचोली येथे सुखरूप १२ वाजता पोहचला त्याच्या टिळ्याचा, वधुचा कुंकू पानवाट्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
रात्री हळदिचा कार्यक्रम आहे, टिळा, कुंकवाचा कार्यक्रम उरकुन सोबतचे काही नातेवाईक गावाकड परतले, असुन उद्याच्या लग्नाच्या तयारीसाठी कामाला लागले आहेत, पावसाने उघडीप दिली तर वाहनाने जातील, रात्रीतुन पाऊस उघडला नाही तर पुन्हा नदि मार्गे वऱ्हाडींना विवाहासाठी जाव लागणार आहे. जलमार्गाने टिळा हळदीच्या कार्यक्रमासाठी नदि मार्गे पोहचलेल्या वराची चर्चा चवीने होत आहे.