तालुक्यात १० दिवसापासून उद्भवलेल्या पुरास्थतीने शेतकरी नागरिक हैराण
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील १० दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीने हिमायतनगर शहरासह तालुक्यातील अनेक वाडी- तांड्याना फटका बसला आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आणि जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दिलेल्या सूचनेनंतर आज दि.१४ रोजी प्रभारी तहसीलदार म्हणून श्री अवधाने यांनी पदभार घेऊन हिमायतनगर तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी, तलाठी यांची टीम उपस्थित होती.
विदर्भ - मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे नदीने पात्र सोडून धोक्यची पातळी गाठली असल्याने अनेक गावाच्या नजीक पुराचे पाणी आले आहे. तर तालुक्यातील विविध साठवण प्रकल्प, सुना तलाव आणि नाले तुडुंब भारावून ओव्हरफ्लोव होऊन पुराच्या पाण्यामुळे शेतीपिके नष्ठ झाल्याची बाब लक्षात घेतली. गेल्या दोन दिवसात हिमायतनगर तालुक्यात १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टी झाल्याचे लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी हिमायतनगर तालुक्यातील पुरस्थितीचे विदारक चित्रण पाहून आजी - माजी आमदारांनी केलेल्या मागणीला अनुसरून हिमायतनगर तालुक्याच्या पुरस्थितीचा धाव घेण्याच्या सूचना प्रभारी तहसीलदार श्री अवधाने याना दिल्या होत्या. प्रथम त्यांनी तालुक्यातील मौजे पोट येथून भेटीला सुरुवात केली. यावेळी मंडळ अधिकारी राठोड, तलाठी दत्तात्रय पुणेकर, मेतलवाड याना सोबत घेऊन तालुक्यातील दुधड भागात तलावाच्या सांडव्यामुळे पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
तालुक्यातील मंगरूळ पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तिन दिवसापासून येथील नागरीकांचा संपर्क तुटला. या पुराच्या पाण्यात एका शतकार्याची गाय वाहून गेल्याने मृत झाली होती. याच गावातील चार पाच घरांची पडझड झाली यामुळे येथील अनेकांचे संसार उघड्यावर आले. सिबदरा येथील ३ घरांची पडझड झाली, कोठा तांडा येथे घर जमीनदोस्त झाले. घारापुरी आणि कामारी गावात पुराचे पाणी शिरले, तसेच वडगाव येथील पुलावरून पाणी वाहत असून, या गावचा संपर्क ६ दिवसापासून तुटला आहे. त्यामुळे तालुक्यातील मौजे मंगरुळ, खैरगाव ज, वडगाव ज, एकंबा, कोठा तांडा, कोठा ज, वाशी, पारवा बू., घारापूर, आंदेगाव, टेंभी, पवना, पळसपुर, वारंगटाकळी, धानोरा, डोल्हारी, सीरपल्ली, शेल्लोडा, दिघी, विरसनी, पिंपरी, कामारी, पोटा बु., दुधड, वाळकेवाडी यासह अनेक गावतील शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे अतिवृष्टीच्या पाण्याने पूर्णतः नुकसान झाले. एवढेच नाहीतर टेम्भुर्णी वाघी परिसरात कैनॉल फुटून शेतीपिके उध्वस्त झाली. या सर्व शेतकऱ्यांना कोणतेही पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ५० हजाराची मदत जाहीर करून प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी होत आहे.
नुकसानीचा आढावा जिल्हाधिकारी साहेबाना सादर करणार असून, नागरिकांना अतिवृष्टी काळात घराबाहेर पडू नये, अनेक गावचा संपर्क तुटल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पूर ओसरल्यानंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल, तोपर्यंत नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबासोबत पशूंची काळजी घ्यावी. कुठेही अडचणीची परिस्थिती उद्भवल्यास प्रश्नाला कळून सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी तहसीलदार श्री अवधाने यांनी जनतेला केलं. तसेच तहसीलदार डी.एन.गायकवाड यांची प्रकृती बिघडल्यामुळे पुर सदृश्य परिस्थितीच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी साहेबानी मला पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले.