जुना कौठा नांदेड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान येथे आ. हंबर्डे यांच्या हस्ते पुजा -NNL

महाआरती, रक्तदान शिबीर, फराळाचे वाटप 


नविन नांदेड।
आषाढी एकादशीच्या निमित्ताने जुना कौठा रविनगर नांदेड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान येथे भव्य महापुजाँ व महाआरती आयोजन व भाविक भक्तांना फराळाचे वाटप जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे तर फळांचे वाटप नगरसेवक राजू काळे यांच्या वतीने १० जुलै रोजी सकाळी  करण्यात आले होते यावेळी गोळवलकर गुरुजी रक्त पेढी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे होते.

 दर वर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त दिनांक-१० जुलै २२ रविवार रोजी भव्य फराळ व फळे वाटप  आयोजन श्री. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, रविनगर कौठा येथे करण्यात आले,प्रांरभी सकाळी सहा वाजता गुरू पवन पुराणीक यांच्या ऊपसिथीत यजमान विनोद काकडे यांच्या हस्ते महापुजा व महाआरती करण्यात आली,व नंतर दर्शनासाठी भाविक भक्तांना खुले करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे बळीरामपुर सर्कल सदस्य गंगाप्रसाद काकडे यांच्या वतीने फराळाचे तर नगरसेवक राजू काळे यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आले. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी व ऊपसिथीत मान्यवरांच्या हस्ते महात्मा आरती करण्यात आली.

यावेळी विठ्ठल रूक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. सतयकामाजी पाठक, सचिव संजय पांडे,रविनगर सोसायटीचे अध्यक्ष दत्ता काळे,सचिव पांडुरंग काकडे, देवराव काकडे, नगरसेवक श्रीनिवास जाधव, निरंजन काकडे, श्रीकांत काळे, गणेश काकडे, प्रा.लक्षमण काळे, गोविंद गोरे,नागेश काकडे, अँड राम काकडे यांच्या सह भाविक भक्तांनी दर्शन घेतले,तर  उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे यांनी भेट देऊन आढावा घेतला.

दुपारी हभप परमेश्वर महाराज कंधारकर यांचे हरि किर्तन व सायंकाळी महिला भजनी मंडळ यांच्या भजनी सोहळा संपन्न झाला. गोळवलकर गुरूजी रक्तपेढी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्त संकलन करण्यात आले. यावेळी डॉ.दिपक अग्रवाल, लक्ष्मीकांत ऊतरवार, गायत्री परदेशी,सतिश आलेवार, सुर्यकांत कोडुरवाड यांनी सहकार्य केले.

आ.मोहन हंबर्डे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या फराळाचे व फळांचे वाटप करून हा ऊपकम गेल्या अनेक वर्षांपासून करत असल्या बद्दल जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे व नगरसेवक राजू काळे पाटील यांचे अभिनंदन करून रक्तदान शिबीरास भेट दिली. सकाळी गावातुन पायी  दिंडी काढण्यात आली होती तर सकाळ पासूनच महिला पूरूष भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी