कुरुळा सर्कलमध्ये बाळासाहेब गोमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
नांदेड, अनिल मादसवार| सदैव विकासाचा दृष्टिकोन बाळगुनच आपण प्रामाणिकपणे काम करीत आलो आहे. सत्ता येते, सत्ता जाते. आताची परिस्थिती पाहता आगामी काळात एक प्रभावी विरोधी पक्षाचे प्रभावीपणे काम करणार असून ही कामे करताना विकास कामांसाठी प्रचंड परिश्रम आणि संघर्ष करण्याची तयारी आहे. आगामी काळात राजकीय विरोध झाल्यास सडेतोड उत्तर देऊ असा खणखणीत ईशारा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आ.अशोकराव चव्हाण यांनी दिला.
कंधार तालुक्यातील कुरुळा येथील माजी जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब गोमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या भव्य काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळ्यास आ.अशोकराव चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजी पांडागळे, डीपीडीसी सदस्य एकनाथराव मोरे, नारायण शिरमनवार, सतीश देवकत्ते, भास्कर जोमेगावकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंडेकर, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की, मागील अडीच वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मनोभावे प्रयत्न केला. कोट्यवधी रुपयांचा निधी अक्षरशः खेचून आणला. जिल्ह्याचा विकास करताना कधीच पक्षीय दृष्टिकोन ठेवला नाही. यापुढेही विरोधी पक्षात जरी असलो तरी जनतेच्या कामासाठी सदैव तयार आहे. वैयक्तीक पातळीवर जावून मी कधीच कोणाचा विरोध केला नाही परंतू जिल्ह्यातील काही मंडळींना माझे नाव घेतल्याशिवाय झोपच येत नाही. माझे नाव घेतल्याने आपण मोठे होतो असे त्यांना वाटते. खालच्या पातळीवर येवून विरोध करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची फळी तयार असल्याचे त्यांनी सांगीतले.
बाळासाहेब गोमारे हा हाडाचा कार्यकर्ता आहे. सीमेवर लढणाऱ्या सैनिकासारखी त्याची भूमिका आहे. मुखेड व कंधार - लोहा विधानसभा मतदार संघाच्या सिमेवर असलेल्या कुरुळा जिल्हा परिषद सर्कलच नव्हे तर कंधार तालुक्यात यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाची ताकद वाढणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. राज्याचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आपण काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करु असा विश्वास या प्रसंगी बाळू गोमारे यांनी दिला. यावेळी कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजी पांडागळे यांनी बाळू गोमारे यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करतानाच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे कंधार तालुक्यात प्क्षाची ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बाळासाहेब गोमारे यांच्या समवेत कुरुळा सर्कलमधील शिवदर्शन चिवडे, शेख मगदुम, भिमराव नाईक, बळवंत मरशिवणे, खाजा नवाज कासार, उत्तम ढवळे, माधव किरपणे, रावसाहेब गंदलेपवाड, आनंत टोम्पे, संतोश मरशिवणे, माधव गिते, संभाजी जाधव, साहेबराव जाधव, दामोधर कोळगिर, माधव कोळगिर, माधव करेवाड, पांडुरंग मुळके, नरसिंह नाईक, यशवंत नाईक, हरी कांबळे, चंद्रकांत ढवळे, धनाजी मरशिवणे, उद्धव यादव, सुरेश देवकत्ते, विठ्ठल निकटे, ज्ञानोबा हळबे, कचरु येरेकर, बबलू परांदे, जयवंत मरशिवणे, विठ्ठल कदम, तानाजी वळसिंगे, ज्ञानोबा गायकवाड, आनंदा कदम, रणजीत कदम, रामचंद्र कांबळे, ज्ञानोबा ढवळे, भगवान नाईक, विठ्ठल सावकार कुरुळेकर, संदीप सोलकर, सचिन पांढरे, भरत नाईक, रहिम पठाण, संतोष मुस्कावाड, पवन कदम, सतीश जायभाये, नामदेव जायभाये, आनंत ढवळे, रामदास कदम, सुधीर वडगावे, नामदेव कदम, राजू कदम, यशवंत कदम, जीवन कदम, ग्यानोबा भारती, धोंडीबा कदम, ज्ञानेश्वर जायभाये, बालाजी होणराव, धनाजी मरशिवणे, विनायक मोरे, किशन मुकनार, दत्ता पाटील, पंडीत सुरनर, राजू कदम, माधव मुकनार, साळबा केंद्रे, बबन केंद्रे, शिवाजी कचरे, बालाजी कचरे, प्रभाकर करेवार, आबासाहेब देशमुख, रामू देशमुख, ज्ञानोबा देशमुख, बाबू मुळके, रामकिशन मुळके, बाळू नलाबले, उस्मान शेख, रहीम शेख, प्रभाकर कदम, श्यामसुंदर देशमुख आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यातील बहुतांश कार्यकर्ते हे कुरुळा जिल्हा परिषद मतदार संघातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठी बळकटी मिळणार आहे. माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष सोहळा संपन्न झाला.
बाळू गोमारे यांच्या प्रवेशाने काँग्रेस मजबुत - बेटमोगरेकर
बाळू गोमारे हा हाडाचा कार्यकर्ता असून माझ्या मुखेड विधानसभा मतदार संघात त्यांचे चांगले वर्चस्व आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणूकीत बाळू गोमारे व त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी दिवसंरात्र काम करेल असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांच्या प्रवेशाने काँग्रेस पक्ष मुखेड आणि कंधार तालुक्यात मजबुत झाला असल्याचे प्रतिपादन मुखेडचे माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी यावेळी केले.