लोहा| लोकप्रतिनिधी यांची वचक नसेल तर यंत्रणा निर्ढावते..कोणाचाच कोणाला पायपोस नसतो..सध्या अशीच अवस्था लोहा तालुक्यातील काही खेडेगावात पाहवयास मिळते आहे. चितळी-देऊळगाव या अडीच किमी अंतराचा रस्ता तो पूर्णतः चिखलाने माखून गेलेला..देऊळगावातील पाचवी ते दहावी पर्यन्त चे विद्यार्थी याच चिखलातून वाट काढीत चितळीच्या हायस्कूल मध्ये जात आहेत ...काय हा चिखल गडे... विद्यार्थी रोजच घसरून पडे...अशी अवस्था ..पण बधिर झालेल्या यंत्रणेला विद्यार्थ्यांचा आवाज ऐकूच येत नाही.
ग्रामीण भागातील रस्त्याची दुरवस्था त्या -त्या गावातील लोकांना पावसाळ्यात ज्या यातना सहन कराव्या लागतात तो त्रास त्यांनाच ठाऊक असतो.देऊळगाव -चितळी असा दोन -अडीच किमी चा जोड रस्ता पूर्वी डांबर होते. पण दुरुस्ती करताना संबंधित गुतेदारांनी ते खोदले आणि या रोडवर माती टाकली त्याचा परिणाम रस्ता चिखलमय झाला..चालताना एक पाय फसला की दुसरा फसणार ...शिवाय चिखलामुळे दोन गावातील ये-जा थांबते पण चितळी येथील हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचे हाल मात्र खूपच आहेत.
देऊळगाव येथील जवळपास शंभर विद्यार्थी चितळी येथील श्री शरद पवार हायस्कूल मध्ये इयता पाचवी ते दहावी वर्गात शिकत असतात पण पावसा पडला की शाळेला जाणार म्हणजे पर्यायाने चितळी मार्ग चिखलमय होतो. याच चिखलातून वाट काढीत ही मुले -मुली शिक्षण घेत आहेत. या रोडचे काम घेणाऱ्या गुतेदारावर संबंधित विभागाची वचक नसावी त्यामुळे हा रोड तीन वर्षातही पूर्णतः झाला नाही. काय हा चिखल गडे... रोजच विद्यार्थी घससरून पडे ..अशी गत या शाळकरी मुलांची झाली आहे.
रस्ता दुरुस्त व्हावा -शैक्षणिक नुकसान टळेल - देऊळगाव ते चितळी रस्तावरून पावसाळ्यात चालणे मोठी कसरत आहे. गेल्या तीन चार वर्षा पासून देऊळगाव येथून शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात चिखल तुडवीत यावे लागते. अनेकजण पडतात त्याची शाळा बुडते शिवाय मार ही लागतो. वारंवार विनंती करून ही कोणीच याकडे लक्ष देत नाही. हा रस्ता किमान चालण्या जोगा व्हावा जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. अशी अपेक्षा श्री शरद पवार हायस्कूल चे मुख्याध्यापक बी बी खांडेकर यांनी व्यक्त केली.