शिवणी, प्रकाश कार्लेवाड। किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवर असलेले अप्पारावपेठ येथे निजाम कालीन तलाव पाहण्यासाठी जिल्हाधिकारी मा.डॉ. विपीन इटनकर थेट तलावाच्या पायथ्याशी येऊन पाहणी केली.
मागील आठ दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अप्पारावपेठ येथील निजाम काळीचा थोरा तलावाला गळती लागली होती. याची माहिती दोन दिवसाखली जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकार यांना देण्यात आली होती. या अनुषंगाने दि.१३ रोजी जिल्हा प्रशासनाने संबधित विभागाला आदेश देऊन तात्काळ तलावाची सुधारणा करण्यात आली होती. याची परिस्थिती पाहण्यासाठी थेट अप्पारावपेठ येथील तलाव पाहण्यासाठी आले असता त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बातचीत केली.
यावेळी साहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार तहसीलदार डॉ.मृणाल जाधव सह बीडीओ धनवे सह महसूल,कृषी वनविभाग आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी सह माजी जि.प.सदस्य सूर्यकांत आरंडकर माजी जि.प.सदस्य शिवराम जाधव भाजापाचे बालाजी आलेवार सरपंच अब्दुल रब पोलीस पाटील भूमारेड्डी लोकावार तंटामुक्ती अध्यक्ष विनायकराव देशामुख.पत्रकार संघाचे तालुका सचिव प्रकाश कार्लेवाड मारोती शेळके,ईश्वर जाधव सह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.