नांदेड| मध्य रेल्वे ने कळविल्या नुसार माजरी ते वणी दरम्यान रेल्वे पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे हे सेक्शन रेल्वे वाहतुकी करिता तात्पुरते बंद करण्यात आले आहे.
परिणामी, गाडी संख्या 11046 धनबाद-कोल्हापूर साप्ताहिक एक्स्प्रेस ला आज दिनांक 19 जुलै, 2022 रोजी वर्धा-बडनेरा-अकोला-पूर्णा-परभणी मार्गे वळविण्यात आले आहे. हि गाडी आदिलाबाद-नांदेड सेक्शन अंतर्गत आज दिनांक 19 जुलै, 2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.