नांदेड| जिल्ह्यात जुलै शनिवार 9 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 58.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 313.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आजही दिवसभर जिल्हाभरात पावसाची संततधार सुरूच असून, अनेक लहान मोठे नाले वाहू लागले असून, तलावही पाणी जमा झाले आहे. तर नद्यासुद्धा दुथडी भरून वाहत आहेत.
जिल्ह्यात शनिवार 9जुलै 2022 रोजीसकाळी 10 वा. संपलेल्यागत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटर मध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसातएकूणपाऊस :नांदेड- 95.70 (364.80), बिलोली- 60.20 (253.70), मुखेड- 30.60 (337.10), कंधार-52.90 (384.90), लोहा-69.90 (331.50), हदगाव-49.30 (247.90), भोकर- 78.30 (273.30), देगलूर-29.90 (330.90), किनवट-30.80 (300.10), मुदखेड- 110.20 (430.10), हिमायतनगर-60.80 (389.70), माहूर- 27.70 (219.20), धर्माबाद-65.70 (270.90), उमरी- 76.10 (335.50), अर्धापूर- 110.80 (312.30), नायगाव- 61.10 (246.40) मिली मीटर आहे.
पावसाची संततधार सुरु असून, अनेक लहान मोठे नाले वाहू लागले असून, तलावही पाणी जमा झाले आहे. तर नद्यासुद्धा दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे शेती परिसरात पाणीच पाणी झाले असून, अनेक शेतकऱ्यांना कोवळ्या पिकाची चिंता सतावत आहे. पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली जात आहे.