नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मातृसेवा आरोग्य केंद्र सिडको यांच्या वतीने वयोगट १२ वर्षचा पुढील जवळपास ८०० मुला मुलींना शिवाजी हायस्कूल सिडको येथे कोरोना दुसरी लस दि. ८ जुलै २२ रोजी देण्यात आली, यावेळी मुख्याध्यापक हंगरगेकर व आरोग्य केंद्र परिचारिका ,आशा वर्कर्स ,शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऊपसिथीत होते.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील वय वर्षे १२ वरील मुलीना कोरोना लस मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश सिंह बिसेन ,साथ रोग अधिकारी डॉ.बद्रोधदीन,यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको मातृ सेवा केंद्राचे डॉ. अब्दुल हमीद, पर्यवेक्षक सुरेश आरगुलवार, एमजिव्हीएस शिवकन्या कैलवाड, अधिपरिचारीका वैशाली वाघमारे, नसिर पिंजारी,मिनाक्षी शिंदे,आशा वर्कर्स राजश्री करडखेले,शिवा सोनकांबळे,सातव ,सोनसेळे यांनी लस दिली. मातृ सेवा आरोग्य केंद्र यांच्या वतीने सिडको हडको परिसरातील प्रत्येक शाळेत ही लस देण्यात येणार असल्याचे पर्यवेक्षक सुरेश आरगुलवार यांनी सांगितले.