अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या - किसान सभा -NNL

३१ जुलै रोजी तालुक्याभरात अतिवृष्टी नुकसान भरपाई,वन जमिन,घरकुल,रस्ते बाबात किसान सभा आक्रमक


किनवट/इस्लापुर।
अखिल भारतीय किसान सभेचा शेतकरी मेळावा इस्लापुर येथे हुतात्मा स्मारक भवनात किसान सभेचे जिल्हा सचिव काॅ.शंकर सिडाम यांच्या अध्यक्षतेखाली ,काॅ.अर्जुन आडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. गेल्या आठवड्याभरात पाऊसाने हाहाकार माजवला असुन प्रचंड अतिवृष्टीने शेतीपिके संपूर्णपणे उदध्वस्त झाली आहे.

 नदी नाल्या लगतची शेती खरडून निघाली आहे,असमानी आणि सुलतांनी सकटात शेतकरी सापडले असतांना अजून सुध्दा प्रशासनाकडुन पंचनामे पूर्ण झालेले नाहीत,इस्लापुर, जलधरा,शिवणी, अप्पारापेठ मंडळात रेकार्ड पाऊसाची नोंद झालेली आहे, संपूर्ण शेती पिकांनाचे अतिवृष्टिने  जबरदस्त नुकसान झालेला असतानां सरकार कडून तातडिणे मदत जाहीर करण्याची अावश्कता असतानां सत्तेसाठी काय झाडी,काय डोंगर ,काय हाॅटेल च राजकारण सरकार करत असुन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे.

शेतीपिंकाच्या नुकसान भरपाईसाठी तातडिणे ५० हजार हेक्टरी मदत जाहीर करा या प्रमुख मागीसह,अतिवृष्टीने अनेक घरांची झालेली पडझड,पशु जनावरे दगावली त्याची नुकसान भरपाई,  वन जमिन कसत असलेल्या शेतकऱ्यांना वन अधिकार कायद्याची ठोस अंमलबजावणी करुन वन कास्तकांराना हकलून लावणे थांबवा, गावा गावात वंचित राहिलेल्या गरजुनां पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करा तथा घरकुलाची अनुदान रक्कम ५ लाख पर्यंत करा, गावा गावाला जोडणारी बांधकाम विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत येणारी सर्व रस्ते,पुले तातडणि बांधा,शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करुन हामीभावाचा केद्रिंय कायदा करा या मागण्यासाठी तालुक्याभरात इस्लापुर, बोधडी,मांडवी ,किनवट इत्यादी ठिकाणी ३१ जुलै रोजी जोरदार आंदोलन करण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आले.

जर तातडिणे अतिवृष्टीची नुकसान भरपाई न मिळाल्यास प्रसंगी हजारो शेतकऱ्यांना घेऊन जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी किसान सभेचे नेते काॅ.अर्जुन आडे यांनी दिला.मेळाव्यात शंकर सिडाम, तुकाराम व्यवारे, तानाजी राठोड,अनिल आडे ,शेषराव ढोले, खंडेराव कानडे, नारायण वानोळे,कोंडबाराव खोकले,अडेलु बोनगीर,मारोती फोले मंचावर उपस्थित होते.

मेळावा यशस्वी करण्यासाठी आनांद लव्हाळे ,राम कंडले,किशन देशमुख, दिलिप तुमलवाड, शिवाजी किरवले, अंबर चव्हाण, यंशवंत राठोड,स्टॅलिन आडे ,गंगाराम गाडेकर, साईनाथ राठोड,अजय आडे,अरुन चव्हाण आदि कार्यकर्तेनी परीक्ष्रम  घेतले.यावेली परिसरातील शेतकरी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी