नांदेड| दक्षिण मध्य रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून मल्काजगिरी--जालना दरम्यान (डेमू) विशेष गाडीच्या सात फेऱ्या करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे --- .
1) गाडी संख्या 07254 जालना ते मल्काजगिरी विशेष गाडी – डेमू (शुक्रवार- तीन फेऱ्या) : हि गाडी जुलै महिन्यात 15, 22 आणि 29 तारखेला जालना रेल्वे स्थानकावरून दर शुक्रवारी रात्री 22.00 वाजता सुटेल आणि परभणी, नांदेड, निझामाबाद मार्गे मल्काजगिरी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 08.50 वाजता पोहोचेल.
2) गाडी संख्या 07428 मल्काजगिरी ते जालना विशेष गाडी-डेमू (शनिवार – चार फेऱ्या) : हि गाडी जुलै महिन्यात 09, 16, 23 आणि 30 तारखेला मल्काजगिरी रेल्वे स्थानकावरून दर शनिवारी रात्री 23.00 वाजता सुटेल आणि निझामाबाद, नांदेड, परभणी मार्गे जालना येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.20 वाजता पोहोचेल. 3) या डेमू गाडीत 8 डब्बे असतील.