नांदेड| एन. सी. सी. ई. एस. एस. विभागाच्या वतीने शुक्रवारी सायन्स महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. एनसीसी व सीटीओचे प्रा. डॉ. पी.डी.सातव, कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.ए. मुनेश्वर यांच्या पुढाकाराने क्रीडा विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नर्सरीतून झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ.डी.यू.गवई, उपप्राचार्य डॉ. एल.पी. शिंदे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रा.विजय ठोसरे, प्रा.काळे, प्रा.योगेश शिरोळे, प्रा. पाईकराव विशाल, भागोजी साळवे, नवनाथ कदम यांच्यासह अनेक छात्र उपस्थित होते.