मुंबई/नांदेड। महाराष्ट्र राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने बहुमत ठरावावर मतदान घेण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन बोलावले होते. त्यात नांदेडचे आ अशोकराव चव्हाण यांच्यासह 6 आमदार अनुपस्थित होते. त्या सर्वांना काँग्रेस पक्षाने त्यांना नोटीस देऊन खुलासा मागविला आहे.
महाराष्ट्र राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने बहुमत ठरावावर मतदान घेण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन बोलावले होते. त्यात पाहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. दुसऱ्या दिवशी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना मतदानासाठी व्हीप बजावला होता.
विशेषतः विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे यावेळी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी हजर राहणे अपेक्षित होते. पण, मंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार शमुख, झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी, माधवराव जवळगावकर हे त्यावेळी गैरहजर राहिले. त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना नोटीस देऊन खुलासा मागविला आहे.