आ.बालाजी कल्याणकर यांच २० दिवसांनंतर नांदेड शहरात आगमन; जल्लोषात स्वागत -NNL


नांदेड|
शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी झालेले नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच २० दिवसांनंतर नांदेड शहरात शुक्रवारी आगमन झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

आपण शिवसेनेतच राहणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नांदेडचा विकास हा एकनाथ शिंदेच करणार, असा विश्वास आमदार कल्याणकर यांनी माध्यमांशी बोलताना केला. नांदेडमध्ये आगमन होताच कल्याणकर यांची रेल्वेस्थानकापासून समर्थकांनी आमदारांच्या घरापर्यंत भव्य रॅली काढली. यावेळी आयटीआय परिसरात क्रेनद्वारे एक क्विंटल फुलांचा हार आणून आ. कल्याणकर यांचे स्वागत करण्यात आले. 

या दरम्यान, समर्थकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार कल्याणकर म्हणाले की, जनतेचे प्रेम पाहून आपण भारावून गेलो आहे. ही अडीच वर्षात केलेल्या कामाची पावती असून मी जनतेच्या कायम ऋणात राहू इच्छित आहे. मी नाराज कशामुळे होतो हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. प्रत्येक ठिकाणी डावलण्यात येत होते. मागे ठेवत होते. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसून जनतेची मला सेवा कराची आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी