नांदेड। आज स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येते राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस चे ज़िल्हाध्यक्ष कन्हैया कदम व NSUI चे ज़िल्हाध्यक्ष शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेला सर्व परीक्षा या पुढे ढकलावा व प्रत्येक पेपर मध्ये किमान दोन दिवसाचा अंतर द्यावा या प्रमुख मागणी साठी आंदोलन करण्यात आले.
बहुतांश महाविद्यालया मध्ये शिकवणी पूर्ण झालेली नाही त्या मुळे विधार्थी हा शिक्षणापासून वंचित झालेला आहे आभ्यासक्रम पूर्ण झालेले नसल्यामुळे तसेच सराव परीक्षा सुद्धा मागील एक ,दोन दिवसापूर्वी झाल्या आहेत. त्यामुळे आभास करण्यासाठी विध्यार्थींना वेळ भेटला नाही तसेच मागील दोन वर्षांपासून परीक्षा या MCQ पद्धतीने घेतल्या गेल्या या वेळी परीक्षा कश्या पद्दतीने होतील हे विध्यार्थ्यांना खूप उशिरा समजलं त्या मुळे वेळेवर परीक्षाची तयारी झालेली नाही आभासक्रम सुद्धा online पद्धतीने शिकवला गेला व परीक्षा या ऑफलाईन पद्धतिने घेतल्या जात आहेत या मुळे विधार्थी हा मानसिक ताणातून जात आहे.
त्यासाठी विध्यार्थाना आभास कारणासाठी वेळ दावा व परीक्षा या पुढे ढकलावा या मागणी साठी आंदोलन करत केले . तसेच कुलगुरू यांची भेट घेऊन निवेदन दिले .कुलगुरू यांनी मागण्याच गाभीर्य लक्षात घेत मागण्या मान्य करत आज रात्री पर्यंत विद्यापीठाचा संकेतस्थळावर नोटीस येईल अशा आश्वासन दिलं. यावेळी प्रतीक देमनगुंडे , फैसल सीदिकि , निखिल वाटोरे , अझीम शेख , प्रसाद पवार , महेश देवसरकर तसेच शेकडो विधार्थी उपस्थित होते.