आंतरराष्ट्रीय योग दिनी हिमायतनगर ( वाढोणा) येथील कार्यक्रमास सर्वानी उपस्थित व्हावं
हिमायतनगर| शहरात गेल्या ३० दिवसापासून योग प्रशिक्षण शिबीर सुरु आहे. त्यातच दि.२१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा मुहूर्त साधून आला असून, हा दिवस मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पतंजली योग समितीच्या शहरातील मुख्य रस्त्याने दुचाकी रैली काढण्यात येऊन या कार्यक्रमात शहरातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
भारताच्या योग विज्ञानाला जगातील २०० देशांनी स्वीकारले आहे. परमपूज्य रामदेव बाबा आणि परमपूज्य आचार्य बालकृष्ण महाराज यांनी घराघरात आणि गावागावात योग-प्राणायाम पोचविले आहे. संशोधनात देखील योग - प्राणायाममुळे मनुष्य निरोगी होतो हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे भारतातील बहुतांश लोकांनी योग - प्राणायामला अंगीकारून शारीरिक आणि मानसिक रोगातून स्वतःला मुक्त केले आहे. त्यामुळे सर्वाना योगाचे महत्व समजले असून, आता प्रत्येक नागरिक योग वर्गात सामील होऊन अंदाडमाय जीवन जगण्यासाठी धडपडत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून हिमायतनगर शहरात योग शिबिराची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. प्रशिक्षण शिबीर सुरु असताना आंतरराष्ट्रीय योग दिवस आल्याने हा दिवस नांदेड जिल्ह्यात अव्वल दर्जाचा व्हावा यासाठी येथील पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट, महिला पतंजली योग समिती, पतंजली किसान सेवा समितीच्या साधकांनी गेल्या ८ दिवसापासून प्रत्येक शाळा, कॉलेज, महाविद्यालय आणि कार्यालयास भेट देऊन माहिती देत प्रयत्न सुरु केले.
आंतराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून दि.२० जून रोजी हिमायतनगर शहरातल्या मुख्य रस्त्याने दुचाकी रैली काढण्यात आली. रैलीची सुरुवात श्री परमेश्वर मंदिरात ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेवानिवृत्त मुख्यध्यापक नागनाथ अक्कलवाड सर यांच्या हस्ते पूजन करून झाली. सदर रैली शहरातील परमेश्वर गल्ली, बजरंग चौक, कालिंका गल्ली, बाजार लाईन, सराफ लाईन, लाकडोबा चौकी आणि परत परमेश्वर मंदिरात आल्यानंतर समारोप करण्यात आला. रैलीतून साधकांनी करो योग ... रहो निरोगी.... घर घर जायेंगे....सबको योग सिखायेंगे.... शुद्ध आहार... शाखाहार....भारत माता कि जय....वंदे मातरमचे नारे देत... आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी पतंजली समितीचे जिल्हा सहप्रभारी अशोक पवार, हुजपाच्या प्राचार्य उज्वला सदावर्ते, गजानन तुप्तेवार, प्रा.माने सर, प्रभाकर पळशीकर, आशिष सकवान, रामभाऊ सूर्यवंशी, उदय देशपांडे, विलास वानखेडे, प्रकाश हंपोलकर, शरद चायल, अनिल दमकोंडवार, दिनेश राठोड, दिलीप शींदे, वामन मिराशे, शुद्धोधन हनवते, परमेश्वर शिंदे, भाऊराव वानखेडे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. सदर रैली यशस्वी करण्यासाठी गजानन चायल, अनिल मादसवार, अमोल धुमाळे, गौतम हनवते, गजानन मनमंदे, साहेबराव अष्टकर, अनिल नाईक, गोपाळ नप्ते, उत्कर्ष मादसवार, पापा पार्डीकर, आदींनी परिश्रम घेतले.
आंतरराष्ट्रीय योग दिनी हिमायतनगर ( वाढोणा) येथील कार्यक्रमास हरिद्वार येथील परमपूज्य महाराज, परमपूज्य श्यामजी भारती महाराज, माहूरगड, परमपूज्य चैतन्य महाराज कोंडदेव आश्रम भोकर, यांची उपस्थिती लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.