महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा.साहेबराव बळवंते रूजू -NNL

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी


मुखेड, रणजित जामखेडकर।
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य म्हणून हिंदी विभाग प्रमुख प्रा.साहेबराव बळवंते यांनी पदभार स्विकारुन रूजू झाले आहेत. 

उपप्राचार्य के.बालाराजू यांच्या सेवानिवृत्तीनंतर सेवाज्येष्ठतेनुसार मितभाषी , अभ्यासू म्हणून परिचित असणारे प्रा.साहेबराव बळवंते यांना नियुक्ति पत्र प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे यांनी दिले . या नियुक्ती समारंभाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी. अडकिणे , व्यासपीठावर प्रा.सी.बी.साखरे , स्टाँफ सेक्रेटरी प्रा.डॉ. डी.के.आहेर , पर्यवेक्षक प्रा.जी.एम.वायफणकर हे उपस्थित होते . उपप्राचार्य नावाची घोषणा झाल्यानंतर प्रा.साहेबराव बळवंते यांचा शाल , पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. डी.के.आहेर तर आभार प्रदर्शन प्रा.व्ही.एस.राठोड यांनी केले .

त्यांच्या निवडीबद्दल वीरभद्र शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य , प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले .

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post