अर्धापूर, नीळकंठ मदने| येथील रहिवासी असलेले व व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील एसटीचे चालक काझी सैफोद्दीन यांच्या मुलगा काझी तौसिफोद्दीन या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत ९५.२०% टक्के गुण घेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
काझी तौसिफोद्दीन याने अर्धापूर येथील शिक्षण प्रेमीच्या आग्रहास्तव सुरू केलेली अर्धापूर येथील अल- रिझवान इंग्लिश स्कूलमध्ये पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण याच संस्थेच्या नांदेड येथील अल-रिझवान हायस्कूल या इंग्रजी शाळेतून पूर्ण केले. तौसिफोद्दीन हा इंग्रजी शाळेत असला तरी त्यास शाळेचे संचालक अब्दुल रशीद यानी त्याची शिक्षण घेण्याची तळमळ पाहून व वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहून फिसमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत दिली होती. तो लहानपणा पासूनच हुशार विद्यार्थी असून त्याने आपल्या घरची परिस्थितीची जाण ठेवत आपण भविष्यात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस एक करत अर्धापूर ते नांदेड एकटाच ये-जा प्रवास करीत असत व अभ्यास करीत दहावीच्या परीक्षेत ९५.२० % टक्के गुण घेत घवघवीत यश संपादन केले आहे.
काझी तौसिफोद्दीन काझी सैफोद्दीन यांच्या यशाबद्दल आई-वडील, मित्रपरिवार यांच्यासह आल-रिजवान शाळेचे संचालक अब्दुल रशीद, मु.अ. सय्यदा तहसीन फातेमा अर्धापूर शाळेच्या मु.अ. गौसिया बेगम, प्रभारी सय्यद मुजीबअली, शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ.काझी मुख्तारोद्दिन देळुबकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष फिरदोस हुसेनी,पत्रकार सखाराम क्षीरसागर, शेख शफिक तांबोळी, शेख अलिम व शिक्षकासह अनेक सामाजिक संघटनेकडून त्याचे स्वागत करत भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.