अर्धापूर| तालुक्यातील लहान येथील रहिवासी प्रगतीशील शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य आनंद लोणे यांची सुकन्या कु.ऐश्वर्या आनंद लोणे हिने इयत्ता १० वी बोर्ड परिक्षेत 95 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
ऐश्वर्या हिचे एम्समधुन डाॅक्टर होण्याचे स्वप्न असून त्यासाठी तिने कठोर मेहनत घेतली आहे.आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी तिने दहावीचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केला आहे तिने ९५ टक्के गुण मिळवले आहेत. तिने मिळविलेल्या यशाबद्दल सेवानिवृत्त केन्दीय माईन्स चिफ ऑफ ब्यूरे रामजी लोणे, काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय लहानकर,माजी सरपंच अशोक सावंत, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस सुभाष लोणे, शिक्षक संघटनेचे नेते बालासाहेब लोणे,प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रमोद लोणे,परळीचे कार्यकारी अभियंता अनिल लोणे,इंजि.सौ.रेखा लोणे, आनंद लोणे,संजय लोणे,पृथ्वीराज गच्चे,विजय सावंत,दलित वाहेवळ, अरूण लोणे आदीने ऐश्वर्या हिचे अभिनंदन करून सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.