श्रीक्षेत्र बासर येथील धार्मिक कार्यक्रमास मोठा प्रतिसाद हजारो भक्तांच्या उपस्थितीत दत्तमंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण -NNL


बासर/नांदेड, अनिल मादसवार।
समर्थ सद्गुरू श्री विष्‍णुदास महाराजांच्‍या कृपेने आणि परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराजांच्‍या मार्गदर्शनात ज्ञानसरस्‍वतीचे अधिष्‍ठान असलेल्‍या तेलंगणा राज्‍यातील बासर येथे श्री गुरुमंदिर नागपूर प्रणित श्री नृसिंहसरस्‍वती आणि सायंदेव सेवा समितीच्‍यावतीने श्रीदत्‍तमंदिर भक्‍तार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यास दिनांक पाच जून पासून हजारो भक्तांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे. या दिमाखदार सोहळ्याचे रविवारी अनेक साधू संत महंत मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले 

याप्रसंगी कर्नाटकातील हंपीपीठाचे शंकराचार्य श्री विद्यारण्‍य भारतीस्‍वामी, संकेश्‍वरच्‍या करवीरपीठाचे मठाधिपती शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती स्‍वामी, नारायण भारती पीठ कंपालीचे शंकराचार्य नारायण विद्याभारती स्‍वामी, हिमालयीन योगी १०४ वर्षे वयाचे श्री सदानंदगिरी महाराज तेलंगणातील प्रसिद्ध संत श्री बबरू महाराज आणि परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराजासह विविध क्षेत्रातील मान्यवर साधू संत महंत यांची प्रमुख उपस्थिती होती. 


श्रीगुरुचरित्रातील 14 व्‍या अध्‍यायाचे पवित्र स्‍थान असलेल्‍या पुरातन दत्‍तमंदिराचा अतिशय भव्‍य जिर्णोद्धार करण्‍यात आला असून पारायण कक्ष व भक्‍तनिवासाचे नवनिर्माण करण्‍यात आले आहे. श्री दत्‍तधाम पारायण कक्षाचे वास्‍तुपूजनही यावेळी झाले आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ‘सूरनाद संध्‍या’ हा प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक व व्‍हायोलिन वादक श्रुती भावे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला या गायनाने उपस्थित भाविक भक्तांची मने जिंकली.


उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पत्रभेट या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना परमपूज्य सद्गुरुदास महाराज म्हणाले, श्रीक्षेत्र बासरच्या जीर्णोद्धाराचे महत्कार्य कळस प्रत जाते आहे. प्रत्येक व्यक्ती प्रमाणेच प्रत्येक भूमीचे ही प्रारब्ध असते. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेऊन शेकडो वर्ष लोटली उपेक्षित स्वरुपातील या संजीवन समाधीचा जीर्णोद्धार सोहळ्याच्या शतक पूर्वार्धात संत एकनाथांनी केला अशी अनेक उदाहरणे आजही पहावयाला मिळतात. तेव्हा भूमीला ही प्रारब्ध असते हेच खरे या न्यायाने श्रीक्षेत्र बासर येथे परम पवित्र श्रीनरसिंह सरस्वती स्वामींनी तारुण्यात पदार्पण करून महासरस्वतीची कृपा प्राप्त करून घेतली 


जठरव्यवस्थेच्या ब्राह्मणाची व्याधी दूर केली. सांय देवाला अभय दिले व त्याच्या पाचव्या पिढीतील सरस्वती गंगाधरांना कडून श्री गुरुचरित्र लिहून घेतले.  या महाक्षेत्राचा जिर्णोध्दार व्हायला सुमारे आठशे वर्ष लागावीत हा प्रारब्धाचा खेळ नवे का? असे सांगून सन 2012 पासून स्थान महात्म्याची जागृती सुरू आहे परिणाम स्वरूप श्री गुरु मंदिराच्या सर्व केंद्रातील माझ्या परिवारानी हे कार्य केले याचा आपणास सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. केवळ गुरूभक्ती वाढावी देवाचे अस्तित्व निर्माण व्हावे तरुण पिढीला जुन्या काळातील भक्तीचा मार्ग मिळावा या दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र बासर येथे श्रीदत्तधाम मंदिर उभारून एक आदर्श निर्माण करण्याचे कार्य होत असल्याचेही सांगितले आहे.

याप्रसंगी उपस्थितांना एक चित्रफित दाखवण्यात आली आहे  या चित्रफितीत श्री दत्तधाम मंदिराच्या प्रारंभी पासून आतापर्यंत झालेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. गुरुचरित्रातील तेरावा आणि चौदावा अध्यायात श्रीदत्तक्षेत्राचा उल्लेख आढळतो. सन  1417 साली याठिकाणी दत्तप्रभूनी अनुष्ठान केले आहे.  तीच ही जागा असून या जागेत आता भव्य मंदिर उभारण्यात आले आहे  सध्या याच मंदिरात पाच दिवसापासून गुरुचरित्राचे पारायण होत आहे.  अन्नपूर्णा भवन, भक्त निवास, कल्याण पादुका, ध्यान मंदिर, गुफा आदी भव्य दिव्य मंदिर उभारले आहे  तसेच गीत विष्णुदास या शिर्डीचे प्रकाशनही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाले आहे.दिनांक चार जूनपासून सुरू असलेल्या या भव्यदिव्य धार्मिक कार्यक्रमाची सांगता दिनांक आठ जून रोजी होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आंध्रप्रदेश, तेलंगणासह महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील भाविक भक्त उपस्थित आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी