नांदेड। तालुक्यातील गुरुवार तारीख दोन जून रोजी नांदेड तालुक्यातील राहाटी सुगाव बुद्रुक व नाळेश्वर येथील वाटप केलेले खोडे तपासण्यात आले पाणी केलेले खोडे व्यवस्थित होते नाळेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला आकस्मिक तपासणी भेट देऊन तपासणी करण्यात आली.
पशुवैद्यकीय दवाखान्यातील एकंदरीत काम समाधानकारक दिसून आले व इतर सूचना देण्यात आल्या तसेच राहटी येथील राष्ट्रीय दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत राहाटी येथील मदर दूध डेअरीला भेट देऊन रोज दररोज सकाळ आणि संध्याकाळ ते दूध संकलन विषयी चर्चा केली व दूध वाडी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले राहटी मदर दूध संकलन केंद्राचे ज्ञानेश्वर बोकारे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करून इतर शेतकऱ्या सोबत चर्चा केली व दूध केंद्र अंतर्गत दूध संकलन वाढण्याचे सांगण्यात आले.
तसेच नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जनावरे खरेदी करून दिलेली जनावरे पडताळणी करण्यात आली नांदेड जिल्ह्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर भूपेंद्र बोधनकर यांच्यासोबत नांदेड पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ अविनाश बुन्नावार यांच्यासोबत उपस्थिती होती तसेच नाळेश्वर येथील डॉक्टर अश्विनी खरवडकर व वाघी स प वि देशमुख तसेच पंचायत समितीचे गजानन मठपती यांची उपस्थिती होती त्यांनी या भागातील विविध योजनेच्या वाटप केलेल्या पाहणी केली व या भागातील समाधान व्यक्त केले.