नपच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका; दुर्गंधी व घाणीमुळे हिमायतनगरातील नागरिकांची उडतेय दाणादाण -NNL

स्वच्छतेसाठी महिन्याला लाखो रुपये खर्चूनही शहरात घाणीचे साम्राज्य जैसेथेच

डासांची उत्पत्ती होऊन साथीचे आजार बळावण्याची भीती वाढली 


हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील नगर पंचायत अंतर्गत साफ साफाई व स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना दुर्गंधीयुक्त व घाण पाण्याचा सामना करावा लागत आहे. नाल्याची नियमित सफाई केली नसल्याने सराफ लाईन, चौपाटी, पोस्ट कार्यालय परिसरात अल्पश्या पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामात दिरंगाई केल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, पहिल्याच पावसाने नाल्याती दुर्गंधीयुक्त घाण रस्त्यावर आल्याने शहरवासियांना पावसाळ्याच्या सुरुवातीला साथीच्या आजाराच्या विळख्यात ओढले जाण्याची शक्यता बळावली आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी लक्ष देऊन हिमायतनगर नपमध्ये चाललेल्या अलबेल कारभाराला लगाम लावावी आणि शहरात जागोजागी अल्पश्या पावसाने रस्त्यावर येणारे घाण पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

मागल्या चार महिन्यापासून हिमायतनगर शहरात नागरिकांची उकाड्याने हैराण झाली आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी नगरपंचायत प्रशासनाच्या स्वच्छता निरीक्षकाने शहरातील सर्वच नाल्याची सफाई करून शहरातील नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा करण्यासाठी ठोस पाऊले उचलूंन संबंधित ठेकदाराकरवी नाल्याची घाण काढून पावसाच्या पाण्याला वाट मोकळी करून देणे गरजेचे होते. मात्र संबंधित ठेकेदाराने पुरेशे मनुष्यबळ आणि वाहनाची कमतरता असल्याने नाले सफरीमध्ये दिरंगाई होते आहे. त्यामुळे नाल्याची थातुर-माथुर पद्धतीने सफाईचे काम केल्याने पहिल्याच पावसात शहरातील अनेक ठिकाणी नाल्या तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी थेट रत्स्यावर येत आहेत. एवढेच नव्हे तर शहरातील विविध वॉर्डातील नाल्यांची साफसफाई १५ -१५ दिवस केली जात नसल्याने शहरातील सराफ लाईन, चौपाटी, जनता कॉलनी, बाजार चौक, मोमीनपुरा परिसरासह इतर भागात अस्वच्छतेचा कळस दिसून येत आहे.


सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून, दि.११ शनिवारी रात्री झालेल्या अल्प पावसाने नाल्या तुंबून दुर्गंधीयुक्त घाण थेट रस्त्यावर आली आहे. त्यामुळे शहरात ये - जा करणाऱ्या नागरिक, महिलांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढावी लागत आहे. साचून राहणाऱ्या या दुरांधियुक्त घाण पाण्याने शहर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, यामुळे मच्छरांची उत्पत्ती होऊन डायरिया, डेंग्यू, मलेरिया यासह इतर साथीचे आजार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी महिन्याला लाखो रुपये खर्चूनही शहरात घाणीचे साम्राज्य जैसेथेच दिसत असल्याने हा पैसे कुठे खर्च होतोय..? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. या बाबीकडे जिल्हाधिकारी डॉ.विपीन नांदेड यांनी लक्ष देऊन नपच्या स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांच्या निष्क्रिय कारभाराची चौकशी करावी. आणि स्वता निरीक्षक याकडे लक्ष का देत नाहीत याची चौकशी होऊन शहरवासीयांना संभाव्य साथीच्या आजारापासून मुक्तता देण्यासाठी तातडीने तुंबलेल्या नाल्यांची सफाई करून जागोजाग साचणाऱ्या पाण्यावर कायम तोडगा काढावा अशी रास्त मागणी शहरवासीय नागरिकांनी केली आहे.

घाणीच्या परिस्थितीमुळे साथीच्या आजाराची लागण होण्याची भीती - रामभाऊ सूर्यवंशी


मागील काळात नगरपंचायत अंतर्गत हिमायतनगर शहरातील विकासासाठी अंदाजे ७० कोटीच्या जवळपास निधी खर्चून विकास करण्यात आला. असे असताना देखील शहरातील घाण पाण्याची विल्हेवाट लावता आली नाही. दोन - चार दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे घाण पाणी रस्त्यावर आल्याने अनेकजण तापाने फणफणत आहेत. रुग्णालयात रुग्णांची गर्दी होत असून, अशीच घाणीची परिस्थिती शहरात राहिली तर साथीचे आजार पसरून डेंग्यू, चिकनगुनिया, डायरिया, ताप, सर्दी खोखला आदींसह पुन्हा कोरोना आजाराची लागण होण्याची भीती भाजपा युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे. तसेच तत्काळ शहरातील नाल्याचे रस्त्यावर येणारे घाण पाणी आणि निर्माण होत असलेल्या डासांच्या उत्पत्तीवर आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी केली आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी