नांदेड| मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व ,ज्येष्ठ निवेदक, प्रवचनकार ,भारत संचार निगम लिमिटेडचे माजी लेखाधिकारी कवी श्री. गोविंद पुराणिक लिखित आंबेकर प्रकाशनाद्वारे प्रकाशित ' गीत गोविंद' या भक्तिगीत संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २६जून, २०२२ रोजी सायंकाळी६:३० वाजता श्री हनुमान मंदिर, अशोक नगर नांदेड येथे वे.शा.सं. श्री. विश्वास शास्त्री घोडजकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न होत आहे .
या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख वक्ते म्हणून मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक ,म.सा.प. केंद्रीय कार्यकारणी औरंगाबादचे सदस्य श्री देवीदास फुलारी तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक प्रजावाणीचे संपादक मा. श्री. शंतनू डोईफोडे यांच्यासमवेत भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. श्री .चैतन्य( बापू) देशमुख, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. श्री. मिलिंद देशमुख, दैनिक सामना जिल्हा प्रतिनिधी मा. श्री विजय जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या भक्तीगीतपर काव्यसंग्रहास प्रधानाचार्य ,आचार्य वेदशास्त्र पाठशाळा प्रभावतीनगर, परभणी येथील वेदांतरत्न प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांची प्रस्तावना लाभली आहे तर काव्यग्रंथांची पाठराखण ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी केली आहे. या काव्यसंग्रहाबाबत समीक्षण रूपाने लेखन श्री. गिरीश देशमुख , सौ. अश्विनी देशमुख आणि प्रा. धाराशिव शिराळे यांनी केले आहे .या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंबालिका शेटे करणार असून या प्रकाशन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन आंबेकर प्रकाशनाचे संचालक श्री अमोल अंबेकर व कवी गोविंद पुराणिक यांनी केले आहे.