नांदेड। धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ यात्रेकरूंनी काढलेल्या विसाव्या नांदेड ते रत्नेश्वरी पाऊस दिंडीत मराठवाड्यात पाऊस पडावा यासाठी रत्नेश्वरी मातेला साकडे घालून गडावर हजारो सिताफळ व जांभूळ बीयाची लागवड करण्यात आली.समारोप प्रसंगी अमरनाथ यात्रेकरूंना रेनकोट, टी शर्ट ,टोपी चे वितरण करण्यात आले.
बालाजी मंदिर हनुमानटेकडी येथे सकाळी सहा वाजता प्रतिष्ठीत व्यापारी सतीश सुगनचंदजी शर्मा यांच्या हस्ते झेंडा दाखवून पाऊस दिंडीची फटाक्याच्या आतिषबाजीत सुरूवात करण्यात आली. रस्त्यामध्ये जागोजागी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. संतुकराव हंबर्डे, बालाजी मंदिर चे महंत कैलास महाराज वैष्णव, अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत समाजाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.सुषमा नरसिंह ठाकूर, नांदेड भूषण माधवराव झरीकर, प्राचार्य बालाजी गिरगावकर, सतीश शर्मा यांच्या तर्फे चहा-फराळा व जांभळाची व आंब्याची व्यवस्था करण्यात आली होती.
ढोल ताश्याच्या गजरात चौदा किमी अंतर यात्रेकरूंनी सहज पूर्ण केले.रतनेश्वरी देवीची मदनेश्वरी व सुभाष देवकते यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. गतवर्षी दिलीप ठाकूर यांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी वर्षभर घरी बिया साठविल्या होत्या. त्याची रत्नेश्वरी गडावर पेरणी करण्यात आली.यानंतर भारती व घनश्याम शर्मा यांच्या हस्ते अन्नपूर्णा देवीची आरती करण्यात आली. हभप रामराव राऊत महाराज यांच्या हस्ते यात्रेकरूंना रेनकोट, टी शर्ट ,टोपी देण्यात आले. संदीप माइंड व विशाल मुळे, डॉ.शुभम कोळेकर यांनी प्रवासासाठी उपयुक्त सूचना दिल्या. दरवर्षी प्रमाणे दानशूर व्यापारी जितेंद्र भयानी यांच्यातर्फे ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला. पाऊस दिंडी मध्ये हे प्राचार्य आत्माराम पळणीटकर, प्रकाश पत्तेवार, तुळजादास बोराळकर ,धोंडोपंत पोपशेठवार, प्रा.नंदकुमार मेगदे, विनोद कापसीकर,दत्तात्रय कोळेकर,
सुधीर विष्णुपुरीकर, ओमकार बंगरवार, सुभाष भाले, पांडुरंग चंबलवार, गंगाधर नगनुरवार, रामकिशन सोनटक्के, ऋषीश्वर गोस्वामी, केशव हळदेकर, अशोक काप्रतवार, लक्ष्मण विभुते, राजेंद्र हनुमंते, डॉ. शिवाजी भोसले, सुभाष शिंदे ,बालाजी दावलबाजे, राजेश्वर सावंत,नारायण गुट्टे ,बाळासाहेब पानसे ,केशव महाजन, रघुनाथ चव्हाण हे सपत्निक सहभागी झाले होते. भारती नेरलकर, संजीवनी वाघमारे, अप्रिता नेरलकर, मीनाक्षी पुजारी,प्रतिभा नेरळकर, लक्ष्मी टेंकाळे, भारती थोटे, अनिता नेरलकर, सुमित्रा टाकळीकर, आशा पवार ,ज्योती ठाकुर यांच्यासह महिलांचा सहभाग देखिल लक्षणीय होता. याशिवाय सटवाजी नांदेडकर ,शिवाजी वारकड, अशोक शिवनगावकर ,गजानन पत्रे, किरण बेले, विष्णू चव्हाण यांच्यासह
अनेक जन दिंडी मध्ये सहभागी झाले होते.पाऊस दिंडी यशस्वी करण्यासाठी अरुणकुमार काबरा, राजेशसिंग ठाकूर, कामाजी सरोदे, ज्ञानेश्वर राऊत, सविता काबरा, अविनाश भयानी, राहुल बनसोडे, आनंद काप्रतवार, मधुसूदन राठी, पावडे मामा, संतोष भारती, सचिन झरीकर यांनी परिश्रम घेतले. विभागीय वाहतूक अधिकारी संजय वावळे यांच्या आदेशानुसार परतीच्या प्रवासासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.गेल्या वीस वर्षापासून दर वर्षी रत्नेश्वरी पदयात्रेत पेरत असलेल्या बियामुळे ओसाड असलेला गड हळूहळू हिरवा होत असल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.