हदगांव। दिव्यांग कृत्रिम अवयव व सहाय्यभुत मोफत मोजमाप साधने पुर्व तपासणी हदगांव तालुक्यातील लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या मार्फत दिव्यांग व्यक्ती करीता या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात हदगांव व हिमायतनगर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील जवळपास 2000 दिव्यांग लाभार्थीने या शिबिरात हजर राहुन लाभ घेतला.
सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय, भारत सरकार कृत्रिम अंग निर्माण निर्गम कानपुर, जिल्हा प्रशासन, समाज कल्याण जिल्हा परिषद नांदेड, ऊखळाई ग्रुप ऑफ एग्रो इंडस्ट्रीज हदगाव, दिव्यांग विकास संघर्ष समिती व मा.आ. माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात सर्व प्रथमच मा.आ. माधवरावजी पाटील जवळगांवकर यांच्या माध्यमातुन दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव व मोफत सहाय्यभुत मोजमाप साधने साहित्य वाटप पुर्व तपासणी व नाव नोंदणी शिबीर हे सुमन गार्डन मंगल कार्यालय डोंगरगांव रोड, हदगांव येथे दिव्यांग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आ. माधवराव पाटील जळगा़वकर यांनी दिव्यांगाच्या शासकीय कामाला व संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांगासाठी असलेल्या अंत्योदय राशन कार्ड व इतर सर्व प्रलंबित दिव्यांगाचे प्रश्न तात्काळ निकाली काढा.
आणि दिव्यांगासाठी असलेली बीज भांडवल योजना बँके मार्फत अनुदान तात्काळ देण्यात येईल. व तसेच दिव्यांग विषयी लवकर एक प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक बोलवुन दिव्यांगाचे सर्व प्रश्न निकाली काढण्यात येईल.असे मत हदगांव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जळगांवकर यांनी म्हटले आहे. या शिबिरात दिव्यांगासाठी व्हिल चेअर, ट्राय सायकल, ट्राय मोटार सायकली,चष्मे, काठ्या, श्रवण यंत्रे, कुबड्या, ब्रेल किट, सि.पी.चेअर,जयपुर फुट, ईत्यादी मोफत दिव्यांग सहाय्यभुत साधने पुर्व तपासणी करीता हदगांव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील व इतर तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तीने या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेतले.
या शिबिरात नांदेड जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी राजु एडके यांनी दिव्यांग विषयी असलेल्या विविध योजने माहिती देऊन दिव्यांगाना विशेष मार्गदर्शन केले. आणि या शिबिरात दिव्यांगासाठी जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हे दिव्यांग शिबीर सर्व सोयीयुक्त व उत्कृष्टरित्या पार पाडले.
त्यांच्या सोबत दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजु ऐडके, ऊखळाई ग्रुप ऑफ एग्रो इंडस्ट्रीज हदगांवचे सतिष खानसोळे पाटील, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, जिवराज डापकर तहसिलदार हदगांव, गट विकास अधिकारी मयुर आंदेलवाड, जि.डी.हाराळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्हि.जी.ढगे, डॉ. प्रदिप स्वामी, तालुका आरोग्य अधिकारी मुरमुरे व कदम, डॉ.रेखाताई चव्हाण, पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, कृष्णा पवार, कुबेर राठोड, दिव्यांग शाळेचे विशेष शिक्षक गजानन मोरे, हदगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष आनंदराव भंडारे,
सविता ताई चव्हाण काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष, अश्विनी गिरी तालुका महिला उपाध्यक्षा, अनिल पाटील बाभळीकर, पंजाबराव पाटील हरडफकर, सुभाष दादा राठोड, संजय माने, अमित अडसूळ, अहमद पटेल माजी न.पा.उपाध्यक्ष खदिर खान, संदीप शिंदे, श्याम पाटील निवघेकर, सुर्यवंशी सर श्रीनिवास हूलकाने, विनोद राठोड, रजनीकांत जाधव, विष्णु चंद्रवंशी, संतोष माने, अक्षय कांबळे दिव्यांग शाळेचे शिक्षक शिवकुमार काष्टे, राम वट्टमवार, धारेश्वर डाके, सुदेश आगरकर, बालाजी वाघमारे, विश्वाभर खाकरे, शिवाजी पाळेकर, प्रभाकर मुघोळ, संजय ऊंडाळ, भास्कर देवसरकर, रवी आचार्य, तानाजी इबितवार, संजय बोधने, प्रकाश राठोड, लक्ष्मण राठोड, देमाजी लकडे, बालाजी वाघमारे, बालाजी किशन, अजय काळे ,कृष्णा नगरसेवक, आदित्य वाटेगावकर , रोहित श्रीरामज्वर, अनिल पवार, दिपक सुर्यवंशी, शंकर वानखेडे,जि.प. शिक्षक वर्ग व परिचारीका आणि जिल्हा व तालुका काॅंग्रेस कमेटीसह शासकीय कर्मचारी ईतर सर्व पदाधिकारी, सि.एस.सी सेन्टरवालेसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.