नांदेड येथील संध्याछाया वृद्धाश्रमात जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध व जनजागृती -NNL


नांदेड।
संध्याछाया वृद्धाश्रम, मालेगाव रोड, नांदेड येथे जनसेवा फॉउंडेशन, एल्डर लाईन 14567 च्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध व जनजागृती दिन कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून अडव्होकेट विष्णू गोडबोले यांनी आई वडील, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम, 2007 या विषयावर माहिती देऊन उपस्थिताना मार्गदर्शन केले. 


ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रतिबंधासाठी तसेच इतर कुठल्याही समस्याच्या निवारण करिता, मार्गदर्शन, मदत व सहाय्याकरिता एल्डरलाईन 14567 या हेल्पलाईनशी संपर्क साधावा. एल्डर लाईन 14567 ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अविरत कटिबद्ध आहे सर्वांनी या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक क्षेत्रीय प्रतिनिधी पांडुरंग मामीडवार यांनी केले तर वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक विक्रम पाटील यांनी आभार मानले. वृद्धाश्रमातील सर्व कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक पुरुष महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी