नांदेड | उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आजादी का अमृत महोत्सव व उमेद- महाजीविका अभियानाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व बँक अधिकारी यांची एक दिवसीय ओरिएंटेशन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
या कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक उमेद अभियानाच्या वर्षा ठाकूर- घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय व्यवस्थापक श्री. कुलकर्णी ,भारतीय स्टेट बँकेचे कुणाल जगताप, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके, भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, युनाइटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, एचडीएफसी, आयसीआयसी, आयडीबीआय, इंडियन ओव्हरसिज बँक, ॲक्सीस बँक, इंडियन बँकचे शाखा व्यवस्थापकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार यांनी केले. या कार्यक्रमाचे मुख्य प्रशिक्षक राज्य आर्थिक सल्लागार दीक्षित सर यांनी पहिल्या सत्रात बँक खाते उघडणे, कर्ज वितरण करणे, आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे, विविध प्रकारचे विमे काढणे, प्रत्येक समूहाला आर्थिक समावेशन करणे याबद्दल सोप्या पद्धतीत माहिती दिली. दुसऱ्या सत्रात समुहाना आर्थीक समावेशन कसे करावे याबाबत विविध उदाहरणासह पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सर्व बँकर्सना माहिती दिली. एस एच जी बँक लिंकेज आर्थिक साक्षरता डिजिटल पारदर्शकता बँकिंग सामाजिक सुरक्षा योजना व एस एच जी आर बी आय मार्गदर्शक पुस्तिका मधील सर्व बँकर्सना माहिती दिली.
या बँक कार्यशाळेचे नियोजन जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन माधव भिसे, जिल्हा व्यवस्थापक सामाजिक समावेशन द्वारकादास राठोड, जिल्हा व्यवस्थापक एम आय एस गणेश कवडेवाड, जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग धनंजय भिसे, कौशल्य समन्वयक अतिष गायकवाड , हणमंत कंदुरके तालुक्याचे तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांची उपस्थिती होती. तालुका अभियान व्यवस्थापक रमेश थोरात यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.