सप्तरंगी साहित्य मंडळाची काव्यपौर्णिमा रंगली ; ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त जवळ्यात विविध कार्यक्रम
नांदेड| ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त जवळ्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यात वृक्षारोपण, कविसंमेलन, व्याख्यान, धम्मदेसना, भोजनदान आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी भदंत पंय्यारत्न थेरो, भंते पंय्यादीप, भंते पंय्यासाथी, अनुरत्न वाघमारे, मारोती कदम, प्रज्ञाधर ढवळे, प्रकाश ढवळे नागलगांवकर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान ढगे, पांडूरंग निखाते, आनंद गोडबोले, भैय्यासाहेब गोडबोले, मिलिंद गोडबोले, श्रीरंग गच्चे, लक्ष्मीबाई गच्चे, सुनिता गच्चे, सुषमा गच्चे, आनंद गच्चे, साहेब गच्चे, विनोद गच्चे, परशुराम गच्चे, राजेश गच्चे आदींची उपस्थिती होती.
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने जवळ्यात ५६ व्या काव्य पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विश्वशांती बुद्ध विहारात भिक्खू संघाच्या धम्मदेसना, आर्थिक दान तथा भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते दीप, धूप आणि पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. याचनेनंतर भदंत पंय्यारत्न यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर अनुरत्न वाघमारे, प्रज्ञाधर ढवळे, प्रकाश ढवळे नागलगांवकर, भगवान ढगे, पांडूरंग निखाते, नंदकुमार ससाणे, विनोद गोडबोले यांनी सहभाग नोंदवला. चला झाडे लावू या ऑक्सिजन पेरु या विषयावर कवी मारोती कदम यांनी काव्यवाचन केले.
दरम्यान, भिक्खू संघाचे गावात आगमन होताच बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांनी भिक्खू संघावर पुष्पवृष्टी करण्यात आली. श्रीरंग गच्चे यांच्या परिवाराने भिक्खू संघाला भोजनदान दिले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वटपौर्णिमेचे औचित्य साधून वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. काव्य पौर्णिमेनंतर व्याख्यान आणि धम्मदेसना संपन्न झाली. बौद्ध उपासक उपासिकांनी आर्थिक दान दिले. आशिर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रास्ताविक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैय्यासाहेब गोडबोले यांनी तर आभार आनंद गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमाला बौद्ध उपासक, उपासिका, बालक, बालिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.