नांदेड। शीख धर्माचे पाचवे गुरु आणि प्रथम हुतात्म्य व्यक्तित्व श्री गुरु अर्जन देवजी यांचा शहीदी पूरब कार्यक्रम शुक्रवार दि. 3 जून रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजता दरम्यान येथील धार्मिक स्थळ गुरुद्वारा तखत सचखंड परिसरात श्रद्धाभावाने पार पाडण्यात आला.
गुरु अर्जुनदेवजी यांनी सन 1604 मध्ये अमृतसर पंजाब येथे हरिमंदर साहिब (स्वर्ण मंदिर) निर्माण करून श्री गुरु ग्रंथसाहेबांची प्रथम पोथी प्रकाशित केली होती. सन 1606 मध्ये बादशाह जहांगीर याने त्यांना धर्म परिवर्तनाची सक्ति करत अनेक प्रकारच्या यातना देऊन शहीद (हुतात्म्य) केले होते. त्या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी शहीदी दिवस पाळण्यात येतो. याचे निमित साधून सामाजिक कार्यकर्ता स. लड्डूसिंघ काटगर यांच्या पुढाकाराने व सामाजसेवक मंडळीच्या परिश्रमाने विविध धार्मिक कार्यक्रम आणि शीख धर्माच्या परंपरेनुसार अरदास करण्यात आली. यावेळी पुलाव, दही, मट्ठा, खारी बूँदी, मिष्ठान इत्यादीचा प्रसाद लंगर स्वरूपात भाविकांना वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख सेवादार म्हणून स. लड्डूसिंघ काटगर, स. गुरमीतसिंघ टामाना, स. केहरसिंघ, स. शेरसिंघ पुजारी, स. लखनसिंघ लांगरी, स. जसबीरसिंघ धूपिया, स. किरपालसिंघ हजुरीया, तेजपालसिंघ शाहू, मन्नू सिंघ भंडारी, सीटूसिंघ सुखाई, कंचनसिंघ पोलीसवाले, नरेंद्रसिंघ धालीवाल, जसकरणसिंघ ज्ञानी सह विविध कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.