अर्धापूर, निळकंठ मदने| भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री जलसंस्कृतीचे जनक श्रद्धेय कै.शंकररावजी चव्हाण साहेबांच्या नावाने असलेल्या अर्धापूर येथील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड, संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर या महाविद्यालयाचे दि.२४ व २५ मे रोजी भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालय व यूजीसीच्या अंतर्गत येणाऱ्या नॅक समिती बेंगलूरने महाविद्यालयाचे NAAC मूल्यांकन केले असता त्यामध्ये महाविद्यालयाने पहिल्याच नॅक मूल्यांकनामध्ये 3.10 CGPA मिळवून A Grade मिळवला.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण, उपाध्यक्ष, माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण भाभीजी, सचिव, माजी राज्यमंत्री मा.डी. पी. सावंत ,सहसचिव ॲड. उदयरावजी निंबाळकर कोषाध्यक्ष तथा महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर कार्यकारिणी सदस्य, प्रसिद्ध उद्योजक नरेंद्रदादा चव्हाण, कार्यकारणी सदस्य यांचे सतत मार्गदर्शन लाभले. तसेच परामर्श अंतर्गत यशवंत महाविद्यालय, नांदेडचे प्राचार्य डॉ.जी.एन. शिंदे व त्यांच्या टिमने महाविद्यालयास नॅक संदर्भात विशेष सहकार्य केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के.पाटील IQAC समन्वयक प्रा.एस.डी.मदनवाड, डाॅ.के.ए.नजम, प्रा.डाॅ.बालाजी अव्हाड व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी नॅकला सामोरे जाण्यासाठी तयारी केली होती. ग्रामीण भागातल्या महाविद्यालयास व पहिल्यांदाच नॅक मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयास 'अ' मानांकन मिळविणाऱ्या महाविद्यालयाची संख्या क्वचितच असते म्हणून ही बाब महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. नॅक मूल्यांकन करण्यासाठी संस्थेच्या सतत पाठपुराव्यातून व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सामूहिक अथक प्रयत्नातून हे घवघवीत यश प्राप्त झाले आहे.