किनवट, माधव सूर्यवंशी| कांंही दिवसात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. प्रशासनाकडून नवीन दोन जिल्हा परिषद गटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात किनवट मधील मोहपूर व माहूर मधील लखमापूर असे दोन गट तयार करण्यात आले आहे. नव्याने तयार झालेल्या गटाचा फायदा नवीन कार्यकर्त्याला होतो की जुन्याच जिल्हा परिषद सदस्याला होतो हे बघावं लागेल.
प्रभाग रचना होण्या आधी राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार प्रदीपजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सर्व आजी माजी व भावी जिल्हा परिषद सदस्यांनी विवाह सोहळ्याच्या माध्यमातून भेटी गाठी तथा कॉर्नर बैठकिचे आयोजन करून दहा पैकी दहा जागा जिंकण्याचा मानस त्यांनी आकला आहे. शिवसेना जिल्हा उपध्यक्ष ज्योतिबा खराटे यांच्याशी जुळून आलेले हितसंबंध बघता वाई मध्ये दोन माजी जिल्हा परिषद सदस्यात चुरस रंगणार की लखमापूर एकाला व वाई ऐकाला देऊन सर्व सामान्य कार्यकर्त्याला अजून पाच वर्ष वाट बघावी लागणार नाही ना.? तेच चित्र नव्याने स्थापन झालेल्या मोहपूर व सारखणी जिल्हा परिषद गटात बघायला मिळेल.
सारखणी जिल्हा परिषद गटात माजी आमदार पुत्र, युवराज भावी उपाध्यक्ष कपिलजी नाईक यांना उमेदवारी जलवळपास फिक्स झाल्यात जमा आहे. आता नव्याने निर्माण झालेल्या मोहपूर जिल्हा परिषद गटात माजी सदस्य.बंडूजी नाईक की माजी जिल्हा परिषद सदस्या यांचे पती युवा कार्यकर्ता विशाल भाऊ जाधव, की नवीन कार्यकर्ता.? दोघा पैकी एकाला उमेदवारी भेटली आणि असच जर घडलं तर नवीन कार्यकर्त्यांना अजून पाच वर्ष वाट बघावी लागणार आहे का.? अशी चर्चा विविध हॉटेल, पान शॉप, कटिंग दुकानात होत आहे. आता बघू यात सामान्य कार्यकर्ता की तेच ते जिल्हा परिषद सदस्यच अजून आरक्षणाचा तिढा कायम आहे, ते जाहीर झालं की सगळं चित्र स्पष्ट होईल..